Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री, पण पीएसयू बँकांनी सावरलं; 'हे' शेअर्स आज ठरू शकतात गेमचेंजर

आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री, पण पीएसयू बँकांनी सावरलं; 'हे' शेअर्स आज ठरू शकतात गेमचेंजर

Stock Market Today : जागतिक संकेतांमध्ये शेअर बाजाराने सुरुवातीच्या सत्रात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरू ठेवली. मागील सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:50 IST2026-02-20T10:50:04+5:302026-02-20T10:50:04+5:30

Stock Market Today : जागतिक संकेतांमध्ये शेअर बाजाराने सुरुवातीच्या सत्रात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरू ठेवली. मागील सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती.

Indian Stock Market Live Feb 20 Sensex & Nifty Open in Red, IT Stocks Drag | आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री, पण पीएसयू बँकांनी सावरलं; 'हे' शेअर्स आज ठरू शकतात गेमचेंजर

आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री, पण पीएसयू बँकांनी सावरलं; 'हे' शेअर्स आज ठरू शकतात गेमचेंजर

Stock Market Today : सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मंदीने झाली आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि देशांतर्गत विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल निशाणात उघडले. सकाळी ९:१६ वाजता सेन्सेक्स ७०.८४ अंकांनी घसरून ८२,४२७ वर, तर निफ्टी ६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,४४८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

आयटी क्षेत्राला 'फटका', पीएसयू बँका सावरल्या
आजच्या सत्रात आयटी आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा सर्वाधिक दबाव दिसून येत आहे. आयटी इंडेक्स १.३ टक्क्यांनी घसरला आहे. इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो आणि एचसीएल टेक यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. दुसरीकडे, सरकारी बँकांच्या निर्देशांकात ०.५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत असून काही अंशी बाजाराला आधार मिळत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये सध्या कोणतीही मोठी हालचाल नसून ते सपाट व्यवहार करत आहेत.

आजचे 'टॉप गेनर्स' आणि 'टॉप लूझर्स'
| टॉप गेनर्स | टॉप लूझर्स |
| कोल इंडिया | इन्फोसिस |
| ओएनजीसी | टेक महिंद्रा |
| एल अँड टी | विप्रो |
| आयशर मोटर्स | एचसीएल टेक |
| भारत इलेक्ट्रॉनिक्स | बजाज फायनान्स |

टॉप गेनर्स टॉप लूझर्स 
कोल इंडियाइन्फोसिस
ओएनजीसी टेक महिंद्रा 
एल अँड टी विप्रो 
आयशर मोटर्सएचसीएल टेक
भारत इलेक्ट्रॉनिक्सबजाज फायनान्स

याव्यतिरिक्त, आज वारी एनर्जीज, रेलटेल, एबीबी इंडिया आणि नोवार्टिस इंडिया यांसारख्या शेअर्सवर गुंतवणूकदारांची विशेष नजर आहे.

वाचा - SBI, HDFC की बँक ऑफ बडोदा? कोणत्या बँकेचे कार लोन परवडेल? 'हा' आहे १० लाखांचा EMI प्लॅन!

रुपया ऐतिहासिक नीचांकी स्तरावर
अमेरिकन डॉलरची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम भारतीय चलनावर झाला आहे. रुपया आज सुरुवातीच्या व्यवहारात २७ पैशांनी घसरून ९०.९५ प्रति डॉलरवर पोहोचला आहे. भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाचा भडका उडाला आहे, तसेच देशांतर्गत शेअर बाजारातील विक्रीमुळे परकीय चलन बाहेर जात असल्याने रुपया कमकुवत झाला आहे.
 

Web Title : आईटी शेयरों में बिकवाली, पीएसयू बैंकों का सहारा; ये शेयर गेमचेंजर बन सकते हैं।

Web Summary : भारतीय शेयर बाजार कमजोर खुला। आईटी सेक्टर पर दबाव, पीएसयू बैंकों का सहारा। कोल इंडिया, ओएनजीसी, एलएंडटी टॉप गेनर रहे। डॉलर की मजबूती और तेल की कीमतों में बढ़ोतरी से रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर।

Web Title : IT stocks sell-off, PSU banks recover; these shares could be game-changers.

Web Summary : Indian stock market opens weak. IT sector faces pressure, PSU banks offer support. Top gainers include Coal India, ONGC, L&T. Rupee hits record low amid dollar strength and rising oil prices.