Lokmat Money >शेअर बाजार > आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

Share Market Today: बाजारात आज मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स ३८६ अंकांनी घसरला, तर निफ्टी २५,१०० च्या खाली आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 17:02 IST2025-09-24T17:02:59+5:302025-09-24T17:02:59+5:30

Share Market Today: बाजारात आज मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स ३८६ अंकांनी घसरला, तर निफ्टी २५,१०० च्या खाली आला.

Indian Stock Market Investors Lose ₹3 Lakh Crore as Sensex Falls for Fourth Straight Day | आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज, २४ सप्टेंबर रोजी सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली. चौफेर विक्रीच्या दबावाखाली प्रमुख बेंचमार्क इंडेक्स पुन्हा एकदा लाल निशाणीवर बंद झाले. या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती आज सुमारे ३ लाख कोटी रुपयांनी घटली आहे.

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या सततच्या विक्रीमुळे बाजाराची मानसिकता कमजोर झाली. याशिवाय, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या इक्विटी मूल्यांकनावरील टिप्पणीचाही गुंतवणूकदारांच्या मनोबलावर परिणाम झाला.

प्रमुख निर्देशांकांची आजची स्थिती
आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स ३८६.४७ अंकांनी घसरून ८१,७१५.६३ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी ११२.६० अंकांनी घसरून २५,०५६.९० अंकांवर स्थिरावला. बीएसई मिड-कॅप इंडेक्स ०.९ टक्क्यांनी, तर स्मॉल-कॅप इंडेक्स ०.५ टक्क्यांनी खाली आला.

फक्त एकाच क्षेत्रात वाढ
आज एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले. सर्वाधिक घसरण आयटी, मीडिया, मेटल, ऑइल अँड गॅस आणि रिॲल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये झाली. हे निर्देशांक ०.५% ते २% पर्यंत घसरले.

टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स
सेंसेक्समधील ३० पैकी फक्त ९ शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये पॉवर ग्रिड (१.६३%), हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, मारुती सुझुकी आणि एचसीएल टेकचे शेअर्स ०.८८% ते १.४८% च्या वाढीसह बंद झाले.

वाचा - 'हा' फोन कॉल तुम्हालाही येऊ शकतो! राज्यसभा खासदार सुधा मूर्तींसोबत काय घडले, नक्की जाणून घ्या

दुसरीकडे, सेंसेक्समधील २१ शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये टाटा मोटर्स (-२.६७%) सर्वाधिक घसरलेला शेअर ठरला. तसेच, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये १.१३% ते २.२४% पर्यंत घट झाली.

एकूण बाजारपेठेची स्थिती पाहिली असता, बीएसईवर आज १,६०४ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर तब्बल २,५६५ शेअर्समध्ये घसरण झाली.

Web Title : बाजार में गिरावट: आईटी, धातु शेयरों में भारी गिरावट; निवेशकों को ₹3 लाख करोड़ का नुकसान

Web Summary : भारतीय शेयर बाजार में लगातार चौथे दिन गिरावट आई, जिसमें आईटी और धातु क्षेत्र में सबसे अधिक गिरावट आई। वैश्विक संकेतों और विदेशी निवेशकों की बिकवाली के बीच निवेशकों को लगभग ₹3 लाख करोड़ का नुकसान हुआ। सेंसेक्स और निफ्टी निचले स्तर पर बंद हुए, अधिकांश क्षेत्रीय सूचकांक लाल निशान में रहे।

Web Title : Market Crash: IT, Metals Lead Fall; Investors Lose ₹3 Lakh Crore

Web Summary : Indian stock markets fell for the fourth consecutive day, with IT and metal sectors leading the decline. Investors lost approximately ₹3 lakh crore amid global cues and foreign investor selling. Sensex and Nifty closed lower, with most sectoral indices in the red.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.