Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; 'या' क्षेत्राला सर्वाधिक फटका

बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; 'या' क्षेत्राला सर्वाधिक फटका

Stock Market Crash : गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ५,५८८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सततच्या विक्रीमुळे बाजारात दबाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:03 IST2025-08-01T17:03:43+5:302025-08-01T17:03:43+5:30

Stock Market Crash : गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ५,५८८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सततच्या विक्रीमुळे बाजारात दबाव आहे.

Indian Stock Market Crash Sensex, Nifty Fall Over 1% Amid Trump's Tariffs and FII Sell-off | बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; 'या' क्षेत्राला सर्वाधिक फटका

बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; 'या' क्षेत्राला सर्वाधिक फटका

Stock Market Crash: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्स ६५० अंकांनी आणि निफ्टी २०० हून अधिक अंकांनी घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ५.२७ लाख कोटींचे मार्केट कॅप एका दिवसात कमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे हा सर्वात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

बाजाराची आजची स्थिती

  • सेन्सेक्स : ५८६ अंकांनी घसरून ८०,५९९ वर बंद झाला.
  • निफ्टी : २०३ अंकांनी घसरून २४,५६५ वर बंद झाला.
  • आज सुमारे २,३५० शेअर्समध्ये घसरण झाली, तर फक्त १,१६८ शेअर्समध्ये वाढ झाली.

सलग पाचव्या आठवड्यात घसरण: दोन वर्षांतील सर्वात मोठा झटका
शेअर बाजार सलग पाचव्या आठवड्यात घसरला आहे, जी गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुमारे १% नी घसरले. मिडकॅप आणि बँकिंग क्षेत्राला या घसरणीचा आणखी मोठा फटका बसला.

घसरणीची प्रमुख ५ कारणे

  1. ट्रम्पचा टॅरिफ शॉक: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'रेसिप्रोकल टॅरिफ, ॲडजस्टेड' हा नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार, भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंवर २५% टॅरिफ (आयात शुल्क) लावला जाईल. यामुळे भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
  2. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री (FII): गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल ५,५८८ कोटींचे शेअर्स विकले. त्यांची ही सततची विक्री बाजारावर दबाव टाकत आहे.
  3. जागतिक बाजारात मंदी: चीन, जपान आणि कोरियासारख्या आशियाई बाजारांमध्येही घसरण दिसून आली. अमेरिकेतही बाजार घसरल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना वाढली.
  4. VIX वाढला, भीती वाढली: बाजारातील अस्थिरता दर्शवणारा इंडिया VIX (Volatility Index) २% नी वाढून ११.७७ वर पोहोचला. VIX वाढला की, बाजारात भीती आणि अनिश्चितता वाढत असल्याचे मानले जाते.
  5. औषध क्षेत्राला दुहेरी धक्का: निफ्टी फार्मा निर्देशांक ३% नी घसरला. ट्रम्प यांनी जगातील १७ मोठ्या औषध कंपन्यांना अमेरिकेतील औषधांच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे. यामुळे सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन यांसारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

पुढे काय होणार? गुंतवणूकदारांसाठी ही संधी की धोका?
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी जर २४,६०० च्या खाली गेला तर तो २४,४५० पर्यंत घसरू शकतो. पण ही घसरण घाबरण्याचे कारण नाही. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर ही एक गुंतवणुकीची संधी असू शकते.

फार्मा, धातू, ऑटो आणि आयटी यांसारख्या क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे, चांगल्या 'क्वालिटी'च्या शेअर्सची निवड करून गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

वाचा - सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Indian Stock Market Crash Sensex, Nifty Fall Over 1% Amid Trump's Tariffs and FII Sell-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.