Stock Market Update : सकाळी घसरणीने सुरुवात झालेल्या शेअर बाजाराने दुपारनंतर चांगलं कमबॅक केलं. परिणामी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणावर बंद झाले. सेन्सेक्समध्ये २२४ अंकांची, तर निफ्टी ५० मध्ये ५८ अंकांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सकाळी धडधड वाढलेल्या गुंतवणूकदारांना दुपारी मोठा दिलासा मिळाला.
दिवसअखेर, सेन्सेक्स ०.२८ टक्क्यांच्या वाढीसह ८०,२०७ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ०.२३ टक्क्यांच्या वाढीसह २४,८९४ च्या पातळीवर स्थिरावला. विशेष म्हणजे, प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत बीएसई मिडकैप (०.७७%) आणि स्मॉलकैप (१.०९%) निर्देशांकांनी खूपच सरस कामगिरी केली.
टाटा स्टील, पॉवर ग्रीड टॉप गेनर्स
शुक्रवारी निफ्टी ५० मधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ टाटा स्टीलमध्ये दिसून आली, तर कोल इंडियाला सर्वाधिक नुकसान झाले.
सर्वाधिक वाढ | वाढ | सर्वाधिक घसरण | घसरण |
टाटा स्टील | ३.४१% | कोल इंडिया | १.३३% |
पॉवर ग्रीड | ३.२३% | आयशर मोटर्स | १.१५% |
हिरो मोटोकॉर्प | २.१८% | टेक महिंद्रा | १.०९% |
हिंडाल्को | १.८९% | मारुती सुझुकी | १.००% |
ॲक्सिस बँक | १.८६% | एसबीआय लाइफ | ०.८९% |
वाचा - सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
मेटल आणि डिफेन्स क्षेत्रात मोठी तेजी
- आज जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. यामध्ये मेटल आणि डिफेन्स क्षेत्रांनी जोरदार कामगिरी केली.
- सर्वाधिक तेजी: निफ्टी इंडिया डिफेन्स (१.९६%) आणि निफ्टी मेटल (१.८२%) या निर्देशांकांनी सर्वाधिक वाढ नोंदवली.
- इतर तेजी: निफ्टी पीएसयू बँक (१.१२%), निफ्टी प्रायव्हेट बँक (०.६५%), निफ्टी इंडिया टूरिज्म (०.६३%), निफ्टी ऑईल ॲन्ड गॅस (०.६२%) आणि निफ्टी एनर्जी (०.५६%) या क्षेत्रांमध्येही उत्साह दिसून आला.
- सप्ताहाचा शेवट तेजीने झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्क वातावरण दिसून येत आहे.