Indian Stock Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय शेअर बाजाराने उत्कृष्ट वाढीसह व्यवहार बंद केला. आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दिसून आलेल्या जोरदार तेजीमुळे आज बाजारात उत्साह संचारला होता. बीएसई सेन्सेक्स ३१९.०७ अंकांनी (०.३८%) वाढून ८३,५३५.३५ अंकांच्या स्तरावर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्स देखील ८२.०५ अंकांनी (०.३२%) वाढून २५,५७४.३५ अंकांवर स्थिरावला.
आयटी आणि फायनान्स शेअर्सची दमदार साथ
आज सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या निशाणीवर बंद झाले, तर निफ्टी ५० मधील ५० पैकी ३२ कंपन्यांचे शेअर्स वाढले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये इन्फोसिस चे शेअर सर्वाधिक २.५५ टक्के वाढीसह बंद झाले आणि त्यांनी बाजाराला मोठा आधार दिला. एचसीएल टेक (२.००%), बजाज फायनान्स (१.६३%), एशियन पेंट्स (१.२८%), टाटा मोटर्स (१.२०%), आणि टीसीएस (१.१९%) यांसारख्या शेअर्समध्येही जोरदार वाढ दिसून आली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एल अँड टी, आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअरही वाढीसह बंद झाले.
वाचा - आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
टाटा समूहाच्या ट्रेंटमध्ये 'भयावह' घसरण
ट्रेंट या टाटा समूहातील कंपनीच्या शेअरमध्ये आज सर्वाधिक ७.४० टक्के एवढी मोठी घसरण दिसून आली. यासोब पॉवरग्रिड (-१.४०%), अल्ट्राटेक सिमेंट (-०.८५%), महिंद्रा अँड महिंद्रा (-०.७२%), आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (-०.६२%) यांसारख्या कंपन्यांना नुकसान सोसावे लागले. बाजारात सध्या आयटी आणि निवडक फायनान्स शेअर्समुळे तेजी दिसत असून, गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.
