Lokmat Money >शेअर बाजार > ४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल

४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल

Stock Market : मंगळवारचे सत्र देशांतर्गत शेअर बाजारासाठी शुभ होते. सलग चार सत्रांच्या कमकुवतपणानंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 16:15 IST2025-07-15T16:15:15+5:302025-07-15T16:15:15+5:30

Stock Market : मंगळवारचे सत्र देशांतर्गत शेअर बाजारासाठी शुभ होते. सलग चार सत्रांच्या कमकुवतपणानंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले.

Indian Share Market Rebounds Sensex-Nifty Up, Mid & Small Caps Shine | ४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल

४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल

Stock Market : गेले चार दिवस शेअर बाजारात सुरू असलेल्या घबराटीनंतर, आज मंगळवारी बाजाराने जोरदार उसळी घेतली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज चांगली खरेदी दिसून आली.

क्षेत्रीय पातळीवर पाहिल्यास, ऑटो आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. याशिवाय, रिॲलिटी, एफएमसीजी (FMCG) आणि सरकारी बँकांच्या शेअर्समध्येही आज सकारात्मक कल दिसून आला.

बाजाराची आजची कामगिरी

  • आजच्या सत्रातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजाराची सर्वसमावेशक वाढ.
  • सेन्सेक्स: ३१७ अंकांच्या वाढीसह ८२,५७१ वर बंद झाला.
  • निफ्टी: ११४ अंकांच्या वाढीसह २५,१९६ वर बंद झाला.
  • निफ्टी बँक: २४१ अंकांच्या वाढीसह ५७,००७ वर बंद झाला.
  • निफ्टी मिडकॅप निर्देशांक: ५६० अंकांच्या वाढीसह ५९,६१३ वर बंद झाला.

आज बाजारात एका शेअरमध्ये विक्री झाली, तर २ शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, ज्यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरण स्पष्ट होते.

कोणत्या शेअर्समध्ये दिसली तेजी?

  1. ऑटो शेअर्स: विशेषतः टू-व्हीलर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली. हिरो मोटो आंतरराष्ट्रीय बाजारातील विस्तार योजना आणि १२५ सीसी सेगमेंटमध्ये मार्केट शेअर वाढवण्याच्या बातम्यांनंतर ५% नी वधारला.
  2. सन फार्मा : लेक्सेल्वी मेडिसिन लाँच झाल्यानंतर ३% नी वाढून बंद झाला.
  3. बजाज ऑटो : या शेअरमधील विक्री थांबल्याचं दिसत होतं आणि तोही ३% नी वधारला.
  4. इंडसइंड बँक : आज दुसऱ्या सत्रातही हा शेअर २% नी वाढून बंद झाला.
  5. एम अँड एम : टेस्लाच्या भारतात प्रवेशानंतरही, ४-चाकी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी कायम राहिली आणि त्यात एम अँड एम आघाडीवर होता.

कोणत्या शेअर्समध्ये दिसली घसरण किंवा संमिश्र कल?

  • एचसीएल टेक्नॉलॉजीज : जून तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा निफ्टीमधील सर्वात कमकुवत स्टॉक होता.
  • आयनॉक्स विंड : सत्राच्या शेवटच्या तासात या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आणि तो ७% नी घसरून बंद झाला.
  • एचडीएफसी एएमसी : सकारात्मक नोंदीनंतर हा शेअर ४% नी वाढून बंद झाला.
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ : अपेक्षेपेक्षा चांगले निकाल असूनही, शेअर दिवसाच्या उच्चांकावरून घसरून बंद झाला.
  • टाटा टेक्नॉलॉजीज : कमकुवत निकाल असूनही, सकारात्मक भाष्यांमुळे हा शेअर आज हिरव्या चिन्हावर बंद झाला.

वाचा - ५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक

आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

Web Title: Indian Share Market Rebounds Sensex-Nifty Up, Mid & Small Caps Shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.