Mutual Fund : प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटतं की आपला पोर्टफोलिओ मोठा असावा. जेणेकरुन कंपनींच्या विविधतेचा फायदा मिळेल. पैशाअभावी अनेकांना ते शक्य होत नाही. मात्र, तुम्हाला अशी संधी चालून आली आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक असलेल्या ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने ICICI प्रुडेन्शियल कॉन्ग्लोमरेट फंड या नावाने एक नवीन एनएफओ बाजारात आणला आहे.
या नवीन फंडात ३ ऑक्टोबर २०२५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गुंतवणूक करता येणार आहे. ही योजना 'कॉन्ग्लोमरेट' थीमवर आधारित एक इक्विटी योजना आहे.
कॉन्ग्लोमरेट फंड नेमका काय आहे?
कॉन्ग्लोमरेट फंड हा अशा कंपन्यांच्या समूहात गुंतवणूक करतो, जे मजबूत प्रवर्तकांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि त्यांच्या किमान दोन सूचीबद्ध कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात.
गुंतवणुकीचा आवाका : सध्या या फंडसाठी सुमारे ७१ कॉन्ग्लोमरेट समूह निश्चित करण्यात आले आहेत, ज्यात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अंदाजे २४० कंपन्यांचा समावेश आहे.
ओपन-एंडेड योजना: हा एक ओपन-एंडेड इक्विटी थीम फंड आहे. तो कोणत्याही मार्केट कॅपिटलायझेशन स्तरावर गुंतवणूक करण्याची लवचिकता ठेवतो, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा धोका कमी होतो.
मंदीतही 'कॉन्ग्लोमरेट'ची खास ताकद
म्युच्युअल फंड कंपनीच्या मते, कॉन्ग्लोमरेट समूहांना संरचनात्मक ताकद मिळते, ज्यामुळे ते बाजारातील चढ-उतार आणि मंदीचा काळ सहजपणे हाताळू शकतात.
- आर्थिक बळ : या समूहांकडे मोठी भांडवली क्षमता, संतुलित ताळेबंद आणि कमी भांडवलाचा खर्च असतो. त्यामुळे त्यांना मंदीच्या काळातही टिकून राहणे आणि नवीन क्षेत्रात विस्तार करणे शक्य होते.
- भविष्यावर लक्ष : ICICI प्रुडेन्शियल AMC चे CIO संकरण नरेन यांच्या मते, भारतातील प्रमुख व्यावसायिक समूहांनी गेल्या अनेक दशकांत स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची क्षमता दाखवली आहे. त्यांनी संघटित रिटेल, दूरसंचार किंवा रिन्यूएबल एनर्जी आणि सेमीकंडक्टर यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये प्रवेश करून दूरदृष्टी दाखवली आहे.
वाचा - FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
या फंडद्वारे गुंतवणूकदारांना भारताच्या बदलत्या विकासगाथेची ताकद दाखवणाऱ्या कंपन्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. गुंतवणूकदारांनी NFO बंद होण्यापूर्वी म्हणजेच १७ ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.