Lokmat Money >शेअर बाजार > Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का?

Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का?

दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी ह्युदाई मोटर्स आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:45 AM2024-02-05T09:45:25+5:302024-02-05T09:46:01+5:30

दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी ह्युदाई मोटर्स आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Hyundai Motors planning to launch IPO Diwali can be open Will it break LIC s record details | Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का?

Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का?

IPO News: दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी ह्युदाई मोटर्स आयपीओ (Hyundai Motor IPO) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केली जाऊ शकते. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे. कंपनी एलआयसीची (LIC) आयपीओ साईज २१००० कोटींना मागे टाकू शकते. रिपोर्टनुसार दिवाळीच्या आसपास कंपनी शेअर बाजारात लिस्ट होऊ शकते. असं झाल्यास कंपनी जवळपास ३ दशकांनंतर भारतीय शेअर बाजारात प्रवेश करेल.
 

ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडचा (Hyundai Motor India Limited) भारतीय बाजारावर चांगला प्रभाव आहे. गेल्या वर्षी मारुती सुझुकीनंतर सर्वाधिक प्रवासी वाहनांची विक्री करण्यात कंपनीला यश आलं होतं.
 

काय आहे कंपनीचं मूल्यांकन? 
 

रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात बँकर पिचमध्ये कंपनीचं मूल्यांकन ३.३ बिलियन डॉलर्स ते ५.६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढलं. सध्या कंपनीचं मूल्यांकन २८ बिलियन डॉलर्स आहे. जे आर्थिक वर्ष २०२३ च्या कमाईपेक्षा ४८ पट जास्त आहे. त्याच वेळी, मूल्यांकनाचं लोअर लिमिट २२ बिलियन डॉलर्स आहे. कमाईच्या तुलनेत हे ३८.४ पट जास्त आहे. दक्षिण कोरियामध्ये ह्युंदाईचं (Hyundai) मार्केट कॅप ३९ बिलियन डॉलर्स आहे.
 

रिपोर्ट्सनुसार, इनव्हेस्टमेंट बँकांच्या यादीत गोल्डमन, सिटी, मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गन, बँक ऑफ अमेरिका, एचएसबीसी इत्यादींचा समावेश आहे. 

Web Title: Hyundai Motors planning to launch IPO Diwali can be open Will it break LIC s record details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.