Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?

गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?

Dividend Stock : जपानी ऑटोमोबाईल कंपनीची भारतीय उपकंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:12 IST2025-08-18T16:11:51+5:302025-08-18T16:12:48+5:30

Dividend Stock : जपानी ऑटोमोबाईल कंपनीची भारतीय उपकंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणार आहे.

Honda India Power Products Declares ₹100 Dividend, Record Date Set | गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?

गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?

Honda India Power : शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना नियमितपणे लाभांश देऊन त्यांच्या नफ्यात सहभागी करून घेतात. आता, जपानी ऑटोमोबाईल कंपनी होंडा मोटरची उपकंपनी असलेल्या होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्सने आपल्या शेअरधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने प्रति शेअर १०० रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे, ज्याची रेकॉर्ड डेटही जाहीर झाली आहे.

२१ ऑगस्ट रोजी 'एक्स-डिव्हिडंड' ट्रेड
होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्सने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवर १०० रुपये म्हणजेच १००० टक्के इतका मोठा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या घोषणेमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. या लाभांशाचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपनीचे शेअर्स गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी एक्स-डिव्हिडंडमध्ये ट्रेडिंग करतील.

याचा अर्थ असा की, जर एखाद्या गुंतवणूकदाराला या लाभांशाचा फायदा घ्यायचा असेल, तर त्याला बुधवारी म्हणजेच २० ऑगस्टपर्यंत शेअर्स खरेदी करावे लागतील. २१ ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतर खरेदी केलेल्या शेअर्सवर लाभांश मिळणार नाही.

शेअर बाजारात 'होंडा'च्या शेअर्समध्ये तेजी
या घोषणेमुळे शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच तेजी दिसून येत आहे. १८ ऑगस्ट रोजी दुपारी २.२२ वाजेपर्यंत, होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्सचे शेअर्स बीएसईवर ११९.१० रुपयांच्या वाढीसह २९८५.३० रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४४९४.०० रुपये, तर नीचांक १८२७.२० रुपये आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ३०२७.०९ कोटी रुपये आहे.

वाचा - चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार

लाभांश हा गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम बोनस मानला जातो. जर तुम्ही होंडा इंडिया पॉवर प्रॉडक्ट्सचे शेअरधारक असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर लाभांशाची ही संधी तुम्ही वेळेवर साधू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Honda India Power Products Declares ₹100 Dividend, Record Date Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.