Hitachi Energy India Share Price: हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर्सनं पाच वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिलाय. पाच वर्षांत कंपनीचे शेअर्स १५ रुपयांवरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर्सनं या काळात गुंतवणूकदारांना ७७,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. हिताची एनर्जी इंडियाचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर १६,५४९.९५ रुपयांवर पोहोचला. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५,७३७.९५ रुपये आहे.
१० हजारांचे झाले ७९ लाख
३ एप्रिल २०२० रोजी एनएसईवर हिताची एनर्जी इंडियाचा शेअर १५.१० रुपयांवर व्यवहार करत होता. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर १२,०१८.२० रुपयांवर पोहोचला. हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरमध्ये या काळात ७७ हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं ३ एप्रिल २०२० रोजी हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर्समध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर १०,००० रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची सध्याची किंमत ७९.५५ लाख रुपये झाली असती.
वर्षभरात पैसे दुप्पट
हिताची एनर्जी इंडियाच्या शेअर्समधील गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात दुप्पट झाले आहेत. मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. हिताची एनर्जी इंडियाचा शेअर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ५८८१.२० रुपयांवर व्यवहार करत होता. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १२,०१८.२० रुपयांवर पोहोचला. हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत २५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ७१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत जवळपास २२ टक्क्यांची घसरण झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)