Income Tax Department Notice: बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (एमएनसी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे परदेशी कंपनीचे एम्प्लॉइज स्टॉक ऑप्शन्स (इएसओपी) किंवा (रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्स) असतील, तर त्यांना आयकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता वाढली आहे. सुत्रांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत परदेशी शेअर्स आणि परदेशाशी संबंधित लाभांची माहिती आयकर विवरणपत्रात न दिल्याबद्दल विभागाने कारवाई तीव्र केली आहे.
नोटीस का येत आहे?
भारताला कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड, फॉरेन अकाउंट टॅक्स कम्प्लायन्स ॲक्ट व ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन या यंत्रणांमधून परदेशी आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते.
ईएसओपी कधी जाहीर करणे बंधनकारक?
व्हेस्ट न झालेले इएसओपी सहसा परदेशी मालमत्ता मानले जात नाहीत. मात्र, इएसओपी वापरल्यानंतर (एक्झरसाइज) प्रत्यक्ष शेअर्स मिळतात तेव्हा कर्मचारी त्या परदेशी शेअर्सचा मालक ठरतो. तेव्हा हे शेअर्स अनुसूची ‘एफए’ (विदेशी मालमत्ता) आणि अनुसूची ‘एएल’मध्ये जाहीर करणे आवश्यक असते.
