HDFC-ICICI Biggest Gainers: गेल्या आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी चांगला ठरला. एकीकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा Sensex 3,076.6 अंकांनी किंवा 4.16% ने वाढला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 953.2 अंकांनी किंवा 4.25% ने वधारला. या काळात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे बाजारमूल्य लक्षणीय वाढले. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न मिळवण्याच्या बाबतीत आघाडीवर होत्या.
ICICI
सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात 3.06 लाख कोटी रुपयांनी वाढले. ICICI बँक आपल्या गुंतवणूकदारांना कमाई करुम देण्यात आघाडीवर राहिली. ICICI बँकेचे मार्केट कॅप 64,426.27 कोटी रुपयांनी वाढून 9.47 लाख कोटी रुपये झाले. दूरसंचार कंपनी भारती एअरटेल दुसऱ्या स्थानावर आहे. एअरटेलचे बाजारमूल्य 53,286.17 कोटी रुपयांनी वाढून सुमारे 9.84 लाख कोटी रुपये झाले.
HDFC
एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत आहे. टॉप-10 मौल्यवान कंपन्यांच्या यादीत बँकेने दुसरे स्थान कायम ठेवले आहे. गेल्या आठवड्यात फक्त पाच ट्रेडिंग दिवसांत, HDFC बँकेने आपल्या गुंतवणूकदारांसाठी तब्बल 49,105.12 कोटी रुपयांची कमाई केली. या कालावधीत बँकेचे बाजार भांडवल 13.54 लाख कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेच्या शेअरबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 5 ट्रेडिंग दिवसांमध्ये एचडीएफसी बँकेचा शेअर सुमारे 4% वाढला आहे.
Reliance
शेअर बाजारातील तेजीदरम्यान देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने देखील आपल्या गुंतवणूकदारांसाठी भरपूर पैसे कमावले. RIL मार्केट कॅप 39,311.54 कोटी रुपयांनी वाढून 17.27 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. इतर कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बजाज फायनान्स एमसीकॅप 30,953.71 कोटी रुपयांनी वाढून 5.52 लाख कोटी रुपये झाले, तर टाटा समूहाची कंपनी टीसीएसचे बाजार मूल्य 24,259.28 कोटी रुपयांनी वाढून 12.95 लाख कोटी रुपये झाले.
एसबीआय ते इन्फोसिस नफ्यात राहिले
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI चे बाजार भांडवलही 22,534.67 कोटी रुपयांनी वाढून 6.72 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. तर FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने त्याच्या बाजार मूल्यात 16,823.08 कोटी रुपयांची भर घातली. टेक दिग्गज इन्फोसिसचे मार्केट कॅप 5,543.9 कोटी रुपयांनी वाढून 6.61 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एकीकडे टॉप-10 मध्ये समाविष्ट नऊ कंपन्यांनी नफा कमावला आहे, तर दुसरीकडे ITC लिमिटेड ही एकमेव कंपनी होती ज्यांचे मार्केट कॅप गेल्या पाच दिवसांत घटले आहे. ITC ला 7,570.64 कोटी रुपयांचा तोटा झाला आणि त्याचे बाजारमूल्य 5.07 लाख कोटी रुपयांवर घसरले.
(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)