Lokmat Money >शेअर बाजार > कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:42 IST2025-08-07T13:42:09+5:302025-08-07T13:42:09+5:30

HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले.

hdfc bank stock that makes you a millionaire 1 lakh became 3 50 crore rupees once the price was less than 10 rupees | कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

HDFC Share News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्कामुळे गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम अनेक शेअर्समध्ये दिसून आला. काही मल्टिबॅगर शेअर्स होते, जे तेजीनंतरही घसरले. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअरचा समावेश आहे. ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी किरकोळ घसरण झाली, असं असूनही या शेअरने गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा दिला आहे. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर या शेअरं ३.५० कोटी रुपयांमध्ये केलंय.

एचडीएफसी बँकेचा शेअर गुरुवारी सकाळच्या सुमारास ०.२८ टक्क्यांनी घसरून १९८० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. गेल्या महिन्याभराचा विचार केला तर त्याचे गुंतवणूकदार काही प्रमाणात तोट्यात आहेत. पण ६ महिने किंवा वर्षभराचा परतावा पाहिला तर तो खूपच जबरदस्त ठरला आहे. दीर्घ काळासाठी या शेअरनं गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत.

ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?

वर्षभरात भरघोस परतावा

वर्षभरात या शेअरचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. एफडी किंवा इतर गुंतवणुकीच्या योजनांपेक्षा एका वर्षात त्याचा परतावाही जास्त झाला आहे. वर्षभरापूर्वी याची किंमत १६२३.५० रुपये होती. आता ती साधारण १९८० रुपये झाली आहे. अशा तऱ्हेनं या शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांना सुमारे २२ टक्के परतावा दिलाय.

पाच वर्षांत चढ-उतार

एचडीएफसी बँकेचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत खूप अस्थिर राहिले आहेत. असं असूनही त्याचा परतावा चांगला मिळाला आहे. वर्षभरात या शेअरनं जवळपास ९० टक्के परतावा दिलाय. मात्र, ६२ महिन्यांत म्हणजेच ५ वर्षांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत यानं गुंतवणुकीची रक्कम दुप्पट केली आहे. जर तुम्ही जून २०२० मध्ये १ लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर ती रक्कम आज दुप्पट झाली असती.

कसे बनला असता कोट्यधीश?

जानेवारी १९९९ मध्ये या शेअरची किंमत ५.५२ रुपये होती. म्हणजेच १० रुपयांपेक्षा कमी. सध्या हा शेअर १९८० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. अशा परिस्थितीत, त्यानं गुंतवणूकदारांना ३५००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर तुम्ही सुमारे २६ वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी १९९९ मध्ये १ लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते, तर त्यांची किंमत आज ३.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असती. अशा परिस्थितीत तुम्ही १ लाख रुपये गुंतवून तुम्ही २६ वर्षांत कोट्यधी झाला असता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: hdfc bank stock that makes you a millionaire 1 lakh became 3 50 crore rupees once the price was less than 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.