Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात भूकंपामुळे हाहाकार, अमेरिकेनं शुल्क आकारल्याचा परिणाम; गुंतवणूकदार बुडाले

बाजारात भूकंपामुळे हाहाकार, अमेरिकेनं शुल्क आकारल्याचा परिणाम; गुंतवणूकदार बुडाले

गुंतवणूकदारांच्या ९.९२ लाख कोटींचा चुराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:09 IST2025-02-12T09:09:34+5:302025-02-12T09:09:34+5:30

गुंतवणूकदारांच्या ९.९२ लाख कोटींचा चुराडा

havoc in the share market a result of US tariffs uk also increased tariff what are the reasons behind share market fall | बाजारात भूकंपामुळे हाहाकार, अमेरिकेनं शुल्क आकारल्याचा परिणाम; गुंतवणूकदार बुडाले

बाजारात भूकंपामुळे हाहाकार, अमेरिकेनं शुल्क आकारल्याचा परिणाम; गुंतवणूकदार बुडाले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील व ॲल्युमिनियमच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केल्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात मंगळवारी दिसून आला. सेन्सेक्स १०१८ अंकांनी घसरून ७६,२९३ अंकांवर बंद झाला; तर निफ्टी ३०९ अंकांनी घसरून २३,०७१ अंकांवर स्थिरावला. बाजारात घसरणीचा हा सलग पाचवा दिवस आहे. रिअल्टी इंडेक्स ३ टक्के, तर मीडिया इंडेक्स २.८५ टक्के घसरला. ऑटो, एफएमसीटी, फार्मा आणि सरकारी बँकांचे शेअर्स २ टक्के घसरले. मेटल आणि आय़टी इंडेक्स १.५% घसरला. 

घसरणीमुळे लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल मंगळवारी घटून ४०८.५० लाख कोटी रुपयांवर आले. सोमवारी, १० फेब्रुवारी रोजी भांडवल ४१७.८२ लाख कोटी इतके होते. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्ती एकाच दिवसात ९.९२ लाख कोटींनी कमी झाली आहे. 

घसरणीमागची नेमकी कारणं काय ?

ट्रेड वॉर भडकण्याची भीती : अमेरिकेनं स्टील व ॲल्युमिनियमच्या आयात शुल्कात वाढ केली. ॲल्युमिनियमवरील शुल्क १० टक्क्यांवरून २५ टक्के केलं. करमुक्त स्टीलवर पुन्हा २५ टक्के आय़ात शुल्क लागू केले. यामुळे जागतिक बाजारात ट्रेड वॉर भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. 

तिमाहीचे कुमकुवत निकाल : तिसऱ्या तिमाहीच्या आलेल्या कमकुवत निकालांमुळे गुंतवणूकदाराचा विश्वास डळमळीत झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये ७ टक्के घसरण झाली. कंपनीचा निव्वळ नफा १७.५ टक्के वाढला; पण तो अपेक्षेपेक्षा कमी राहिला. उच्च उत्पादनखर्च आणि जास्त मार्जिन असलेल्या मोटारसायकलींच्या विक्रीत घट झाल्यामुळे नफ्यावर परिणाम झाला. 

सोन्याचा ८५,९०३ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक

‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ने जारी केलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सोनं २३८ रुपयांनी वाढून ८५,९०३ रुपये प्रति १० ग्रॅम झालं. हा सोन्याचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. आदल्या दिवशी सोनं ८५,६६५ रुपये प्रति १० ग्रॅम होतं. 

अमेरिकेनंतर ब्रिटनची व्याज दर कपात व भू-राजकीय तणावामुळे सोन्याला बळ मिळालं. यंदा सोनं ९० हजार रुपयांवर जाईल, असं जाणकारांचे म्हणणं आहे. १ जानेवारीपासून सोनं ९,७४१ रुपयांनी महाग झालंय. १ जानेवारी रोजी सोनं ७६,१६२ रुपयांवर होतं. मंगळवारी चांदी १,१२३ रुपयांनी उतरून ९४,४१० रुपये प्रति किलो झाली. आदल्या दिवशी ती ९५,५३३ रुपये किलो होती. या कालावधीत चांदीही ८६,०१७ रुपये किलोवरून ९,५१६ रुपयांनी वाढून ९५,५३३ रुपये किलो झाली आहे.

Web Title: havoc in the share market a result of US tariffs uk also increased tariff what are the reasons behind share market fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.