Lokmat Money >शेअर बाजार > 'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?

'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?

२० ऑगस्ट २०२५ पर्यंत कंपनीचे ​​शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश मिळणार आहे. केंद्र सरकारलाही या लाभांशामध्ये सरकारला ७१८.६ कोटी रुपये मिळतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:36 IST2025-06-28T12:36:38+5:302025-06-28T12:36:38+5:30

२० ऑगस्ट २०२५ पर्यंत कंपनीचे ​​शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश मिळणार आहे. केंद्र सरकारलाही या लाभांशामध्ये सरकारला ७१८.६ कोटी रुपये मिळतील.

HAL stock price Maharatna company will pay 300 percent dividend Shares have rise by 1184 percent in 5 years do you have it | 'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?

'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?

HAL Stock Price: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या महारत्न कंपनीनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ३०० टक्के अंतिम लाभांश जाहीर केला आहे. म्हणजेच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर १५ रुपयांचा अंतिम लाभांश देणार आहे. एअरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीनं लाभांशाची विक्रमी तारीख गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ निश्चित केली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) समभाग गेल्या पाच वर्षांत १,१८४ टक्क्यांनी वधारले आहेत.

सरकारला मिळणार ७१८ कोटी

२० ऑगस्ट २०२५ पर्यंत हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे ​​शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश मिळणार आहे. केंद्र सरकारचा हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये ७१.६४ टक्के हिस्सा आहे. या लाभांशामध्ये सरकारला ७१८.६ कोटी रुपये मिळतील. कंपनीनं २०२५ या आर्थिक वर्षातील हा दुसरा लाभांश दिला आहे, याआधी कंपनीनं फेब्रुवारीमध्ये प्रति शेअर २५ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडनं २०२४ या आर्थिक वर्षात प्रति शेअर १३ रुपये अंतिम लाभांश दिला होता.

५ वर्षांत ११८४% वधारले शेअर्स

गेल्या पाच वर्षांत महारत्न कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) शेअर्समध्ये ११८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २६ जून २०२० रोजी एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित या कंपनीचे शेअर्स ३८१.३५ रुपयांवर होते. २८ जून २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४८९६.६० रुपयांवर बंद झाले. गेल्या चार वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये ८४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या शेअर्समध्ये १५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्सच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५६७५ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३०४५.९५ रुपये आहे.

३९५८ कोटींचा नफा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं चौथ्या तिमाहीत ३९५८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीचा नफा ७.८ टक्क्यांनी कमी झाला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूलही ७.२ टक्क्यांनी कमी होऊन १३७०० कोटी रुपये झाला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA ५२९२ कोटी रुपये होता, तर मार्जिन ३८.६ टक्के होतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: HAL stock price Maharatna company will pay 300 percent dividend Shares have rise by 1184 percent in 5 years do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.