Gujarat Toolroom share Price : गुजरात टूलरूम लिमिटेडच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गुजरात टूलरूमचा शेअर गुरुवारी बीएसईवर ५ टक्क्यांनी वधारून १८.०८ रुपयांवर पोहोचला. बुधवारी कंपनीच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. गुजरात टूलरूम १:५ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची शक्यता आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५.९७ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०.७५ रुपये आहे.
गुजरात टूलरूम लिमिटेड आपल्या गुंतवणूकदारांना १:५ या प्रमाणात बोनस शेअर्स देऊ शकते. कंपनीच्या संचालक मंडळाची सोमवारी, ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक होणार आहे, असं गुजरात टूलरूमनं एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटलंय. या बैठकीत १:५ या प्रमाणात बोनस समभाग देण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे. कंपनीनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. गुजरात टूलरूमनेही मार्च २०२३ मध्ये आपल्या शेअर्सचे विभाजन केले आहे. कंपनीनं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचं १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरमध्ये विभाजन केलं.
५ वर्षांत ४६००% पेक्षा अधिक तेजी
गुजरात टूलरूम लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत ४६५७% वाढ झाली आहे. गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १४८५% वाढ झाली. गेल्या महिन्याभरात गुजरात टूलरूमच्या शेअरमध्ये जवळपास ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत शेअर ५२ टक्क्यांनी वधारला. एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, गेल्या वर्षभरात गुजरात टूलरूमचे शेअर्स ५२ टक्क्यांनी घसरले आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)