Lokmat Money >शेअर बाजार > GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

Market today : आयटी, रिअल्टी आणि मेटल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक वाढत्या पातळीवर बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:16 IST2025-09-04T17:16:41+5:302025-09-04T17:16:41+5:30

Market today : आयटी, रिअल्टी आणि मेटल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक वाढत्या पातळीवर बंद झाले.

GST Reform Hopes vs Global Headwinds Indian Market Shows Mixed Signals | GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

Stock market : जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर शेअर बाजाराने दिवसाची सुरुवात जमदार केली होती. मात्र, नंतर नफावसुली झाल्याने सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून घसरून बंद झाले. ४ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून ८०,७१८ वर, तर निफ्टी १९ अंकांनी वाढून २४,७३४ वर बंद झाला. निफ्टी बँकही ८ अंकांच्या किरकोळ वाढीसह ५४,०७५ वर स्थिरावला. दुसरीकडे, मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स मात्र अनुक्रमे ३८६ आणि ४४ अंकांच्या घसरणीसह बंद झाले.

आज बाजारात संमिश्र कल दिसून आला. ऑटो आणि एफएमसीजी यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली, तर संरक्षण, ऊर्जा, आयटी, रिअल्टी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. निफ्टीच्या ५० पैकी ३१ शेअर्समध्ये, सेन्सेक्सच्या ३० पैकी १९ शेअर्समध्ये, तर निफ्टी बँकेच्या १२ पैकी ९ शेअर्समध्ये घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाही ८ पैशांनी कमकुवत होऊन ८८.१५ च्या पातळीवर बंद झाला.

तज्ज्ञांचे विश्लेषण आणि बाजाराचा पुढील कल
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, नुकत्याच जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे देशातील उपभोग-आधारित वाढीला बळकटी मिळेल. याचा सर्वात जास्त फायदा ऑटो आणि ग्राहक-उपयोगी वस्तूंच्या क्षेत्राला होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित काही निवडक मेटल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेअर्सही गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी राहतील.

तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, मजबूत कॉर्पोरेट कमाईमुळे भारताचा आर्थिक विकास दर २०२६ मध्ये ६.५ टक्के आणि २०२७ मध्ये ७ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. जीएसटीमधील हे सुधारणात्मक बदल अर्थव्यवस्थेच्या गतीला आणखी वेग देऊ शकतात. मात्र, जागतिक मॅक्रो परिस्थिती, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल आणि अमेरिकेच्या टॅरिफशी संबंधित आव्हाने बाजाराला अस्थिर ठेवत राहतील. त्यामुळे नजीकच्या काळात बाजारात एकत्रीकरणाची शक्यता नाकारता येत नाही.

वाचा - पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी जोखीम-लाभाचा विचार करून, मूलभूतपणे मजबूत असलेल्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास, निफ्टी २४,३५०-२४,५०० च्या रेंजमध्ये डबल बॉटम तयार करत आहे. जर निफ्टीने २४,७७० चा रेजिस्टेंस तोडला, तर तो २५,००० चा टार्गेट गाठू शकतो आणि त्यानंतर बाजारात एक नवीन तेजी सुरू होऊ शकते.

Web Title: GST Reform Hopes vs Global Headwinds Indian Market Shows Mixed Signals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.