Groww Share Price NSE Today : बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड (Groww) या फिनटेक स्टार्टअपचे शेअर्स बाजारात सुस्साट झाले आहेत. लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी, ग्रोच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स बीएईसमध्ये १५ टक्क्यांहून अधिक उसळी घेऊन ₹ १५३.५० वर पोहोचले होते.
कंपनीचे शेअर्स अवघ्या दोन दिवसांत ₹ १०० वरून ₹ १५३ च्या पुढे गेले आहेत. इश्यू प्राइसच्या तुलनेत ग्रोच्या शेअर्सनी आता ५० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिलाय. कंपनीचे शेअर्स बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी बाजारात लिस्ट झाले आहेत.
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
चांगली लिस्टिंग आणि विक्रमी तेजी
ग्रो (Groww) चे शेअर्स बुधवारी बीएईसमध्ये १४ टक्क्यांच्या फायद्यासह ₹ ११४ वर लिस्ट झाले होते. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स बुधवारी वाढीसह ₹ १३०.९४ वर बंद झाले होते. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरचा दर ₹ १०० होता. ग्रोचा आयपीओ बोली लावण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडला होता आणि तो ७ नोव्हेंबरपर्यंत खुला होता. ग्रो च्या पब्लिक इश्यूची एकूण साईज ₹ ६,६३२.३० कोटी पर्यंत होती.
आयपीओला मिळाला होता १७ पटींहून अधिक प्रतिसाद
बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेडच्या आयपीओला एकूण १७.६० पट सबस्क्रिप्शन मिळालं होते. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या (Retail Investors) श्रेणीत ९.४३ पट बोली लागली. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (Non-Institutional Investors - NII) श्रेणीत १४.२० पट सबस्क्रिप्शन मिळालं. ग्रोच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या श्रेणीत २२.०२ पट बोली लागली.
कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये १५० शेअर्स होते. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओच्या एका लॉटसाठी ₹ १५,००० ची गुंतवणूक करावी लागली होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
