Lokmat Money >शेअर बाजार > IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ?

IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ?

Groww IPO: जाणून घ्या काय आहे ग्रो चा प्लान आणि कधी येणार आयपीओ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:25 IST2025-03-26T13:22:31+5:302025-03-26T13:25:11+5:30

Groww IPO: जाणून घ्या काय आहे ग्रो चा प्लान आणि कधी येणार आयपीओ.

Groww preparing to enter the IPO market plans to raise rs 5800 crore When will the IPO come | IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ?

IPO मार्केटमध्ये Groww एन्ट्री करण्याच्या तयारीत, ₹५,८०० कोटी उभारण्याची योजना; कधी येणार आयपीओ?

Groww IPO:  स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म ग्रो नवीन फंडिंग राऊंडची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी २०० मिलियन डॉलर (सुमारे १,६६० कोटी रुपये) उभारण्याची योजना आखत आहे. यासाठी ग्रो नं सिंगापूरचा सॉवरेन वेल्थ फंड जीआयसी आणि विद्यमान गुंतवणूकदार टायगर ग्लोबल यांच्याशी बोलणी सुरू केली आहेत. हा करार झाल्यास बेंगळुरूच्या या स्टार्टअपचे मूल्यांकन ६.५ अब्ज रुपयांपर्यंत (सुमारे ५४ हजार कोटी रुपये) पोहोचू शकतं. २०२१ मध्ये ग्रो चं मूल्यांकन केवळ ३ अब्ज डॉलर्स होतं. नऊ वर्षांपूर्वी ललित केशरे, हर्ष जैन, ईशान बन्सल आणि नीरज सिंग यांनी ग्रो या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला ते फक्त म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर होते, आज ते भारतातील सर्वात मोठे शेअर ब्रोकर बनले आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. ग्रोचा आयपीओ आणि नवीन रणनीती बाजारात खळबळ माजवतील, परंतु सेबीची कठोरता आणि एफ अँड ओवरील अवलंबित्व हे एक आव्हान आहे. जीआयसी आणि टायगर ग्लोबलनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ग्रो यांनीही ईटीच्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही.

मोदी सरकारनं बंद केली ‘ही’ बहुचर्चित स्कीम; का घेण्यात आला हा निर्णय, जाणून घ्या

हा निधी ग्रोच्या आगामी आयपीओची तयारी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कंपनी पुढील काही महिन्यांतच आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर दाखल करू शकते. ईटीच्या मागील रिपोर्टनुसार, ग्रो आयपीओच्या माध्यमातून ७०० मिलियन डॉलर्स (अंदाजे ५,८०० कोटी रुपये) उभारण्याची योजना आखत आहे. आयपीओपूर्वी ग्रो नं आपलं डोमिसाइल अमेरिकेतून भारतात आणलंय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी हे पाऊल उचललं होतं.

झिरोधा आणि एंजल वनशी थेट टक्कर

ग्रो थेट झिरोधा आणि एंजल वनशी स्पर्धा करते. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ग्रो चे फेब्रुवारीमध्ये १.३ कोटीसक्रिय ग्राहक होते, तर झिरोदाचे ८० लाख आणि एंजल वनचे ७७ लाख युजर्स होते. ग्रो च्या अॅक्टिव्ह ट्रेडर्समध्ये गेल्या महिन्यात २ लाखांपेक्षा जास्त घसरण झाली, जी दोन वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच झाली.

आर्थिक स्थिती कशी? 

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ग्रो चा महसूल ३,१४५ कोटी रुपये होता, परंतु अमेरिकन अधिकाऱ्यांना कर भरण्यात कंपनीचं ८०५ कोटी रुपयांचे नुकसान झालं. हा तोटा अमेरिकेतून भारतात (रिव्हर्स फ्लिप) स्थलांतरित झाल्यामुळे झाला.

Web Title: Groww preparing to enter the IPO market plans to raise rs 5800 crore When will the IPO come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.