Groww IPO: बंगळुरूस्थित फिनटेक कंपनी ग्रो च्या आयपीओमध्ये ४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून गुंतवणूक करता येणार आहे आणि तुम्ही ७ नोव्हेंबर २०२५ यात गुंतवणूक करू शकता. कंपनीनं त्यांच्या शेअर्सची किंमत प्रति शेअर ₹९५ ते ₹१०० अशी ठेवली आहे. हा आयपीओ नवीन शेअर जारी करणं आणि विद्यमान भागधारकांनी विक्री करणं (ऑफर फॉर सेल - OFS) मिळून आहे. या आयपीओद्वारे कंपनीचं एकूण ₹६,६३२.३० कोटी उभारण्याचं उद्दिष्ट आहे, ज्यापैकी ₹१,०६० कोटी नवीन शेअर जारी करून आणि उर्वरित ₹५,५७२.३० कोटी विद्यमान भागधारकांनी विक्री करून येतील.
ग्रे मार्केट प्रीमियम (GMP)
ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ₹१७ किंवा अंदाजे ₹११७ च्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. हे मजबूत लिस्टिंग नफ्याची शक्यता दर्शवते. IPO च्या पहिल्या दिवशी सकाळीपर्यंत, वाटपासाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या ०.०९ पट अर्ज प्राप्त झाले होते. किरकोळ गुंतवणूकदार भाग ०.३९ पट सबस्क्राइब झाला होता आणि मोठ्या गुंतवणूकदाराचा (NII) भाग ०.०९ पट सबस्क्राइब झाला होता.
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
वाटप आणि लिस्टिंग तारीख
शेअर्सचे वाटप ८ नोव्हेंबर २०२५ रोजी होण्याची अपेक्षा आहे, परंतु ही तारीख शनिवार आहे, त्यामुळे ती १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सची लिस्टिंग करण्याची सर्वात संभाव्य तारीख १२ नोव्हेंबर २०२५ आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये १५० शेअर्स ठेवण्यात आले आहे. त्यानुसार एका लॉटसाठी किमान १५,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
लॉट साईज आणि इतर तपशील
एक गुंतवणूकदार किमान १५० शेअर्सच्या लॉटसाठी अर्ज करू शकतो. या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून एमयूएफजी इंटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
