Multibagger Stock : शेअर बाजारात कोणता शेअर कधी कमाल करेल आणि आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करेल, हे कोणीही सांगू शकत नाही. पण बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी अशी कमाल करून दाखवली आहे. असाच एक शेअर आहे ग्रेविटा इंडिया लिमिटेड, जो कमी कालावधीतच गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी फक्त १,००,००० रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांची रक्कम आता ३४ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.
३,३४६% चा जबरदस्त रिटर्न
ग्रेविटा इंडिया ही एक रिसायकलिंग कंपनी आहे, जी प्रामुख्याने शिसे, ॲल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या रिसायकलिंगमध्ये विशेषज्ञ आहे. १९९२ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा व्यवसाय भारत, आफ्रिका, मध्य पूर्व आणि इतर खंडांमध्ये पसरलेला आहे. ११ सप्टेंबर २०२० रोजी ग्रेविटा इंडियाच्या एका शेअरचा भाव केवळ ४९.३० रुपये होता, जो आता वाढून १,६९९ रुपये झाला आहे. या हिशोबाने, फक्त पाच वर्षांच्या कालावधीतच गुंतवणूकदारांना तब्बल ३,३४६ टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे.
१ लाखाचे झाले ३४ लाख
पाच वर्षांत ३,३४६ टक्के परतावा देणाऱ्या या शेअरचा फायदा पाहिल्यास, एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी म्हणजेच ११ सप्टेंबर २०२० रोजी या स्टॉक मध्ये ४९ रुपयांच्या दराने १ लाख रुपये गुंतवले असतील, आणि ते आतापर्यंत होल्ड केले असतील, तर त्यांची ही रक्कम आता ३४,४६,००० रुपये झाली असेल.
शेअरची वार्षिक कामगिरी
गेल्या काही वर्षांत या शेअरने अशी झेप घेतली आहे की, गुंतवणूकदारांवर जणू पैशांचा पाऊसच पडला.
- ११ सप्टेंबर २०२०: ४९.३० रुपये
- ९ सप्टेंबर २०२१: २००.२० रुपये
- ९ सप्टेंबर २०२२: ३३०.३५ रुपये
- १५ सप्टेंबर २०२३: ८०४ रुपये
- सप्टेंबर २०२४: २,७०० रुपयांचा विक्रमी उच्चांक (लाइफटाईम हाय)
- सध्याचा भाव: १,६९९ रुपये
मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, ग्रेविटा इंडियाचा शेअर २.४९% च्या वाढीसह १,६९९ रुपयांवर बंद झाला. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य वाढून १२,३३० कोटी रुपये झाले आहे. या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,७०० रुपये, तर नीचांक १,३७९.६५ रुपये आहे.
वाचा - एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)