Multibagger PSU Stocks:शेअर बाजाराचीगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे, पण कधी-कधी असा शेअर तुमच्या हाती लागतो, जो अल्पावधीत दमदार कमाई करुन देतो. विशेष म्हणजे, खासगी कंपन्यांसोबतच सरकारी कंपन्यांचे शेअर्सही जोरदार परतावा देण्यात मागे नाहीत. अशा शेअर्सना PSU शेअर्स म्हणतात. BSE चा PSU निर्देशांक वेगाने धावत असून, केवळ एका वर्षात हा निर्देशांक जवळपास 100% वाढला आहे. काही PSU कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत झपाट्याने झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. एका अहवालानुसार, तीन PSU कंपन्यांच्या शेअर्सनी दोन वर्षांत प्रचंड नफा दिला आहे. तुम्ही या कंपन्यांमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे सुमारे 10 लाख रुपये झाले असते.
Mazagon डॉक शिपबिल्डर्स
या कंपन्यांमध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या शेअर्सची किंमत जून 2024 पर्यंत 234.85 रुपयांवरून 3,968.25 रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यानुसार, यात 1,590% वाढ झाली आहे. कोचीन शिपयार्ड आणि रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ने देखील 1,000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. सोप्या शब्दात, आपण असे म्हणू शकतो की, जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्हाला 10 लाख रुपये मिळाले असते.
अनेक PSU कंपन्यांना फायदा
सरकारी प्रयत्नांमुळे PSU शेअर्स जोरदार प्रदर्शन करत आहेत. या प्रयत्नांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा, अधिक सरकारी खर्च आणि चांगले प्रशासन यांचा समावेश आहे. अनेक PSU कंपन्यांना याचा फायदा झाला आहे. या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती 500% ते 950% पर्यंत वाढल्या आहेत. उदाहरणार्थ, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, BSE सेन्सेक्स अलीकडच्या काळात 50% ने वाढला आहे, तर PSU कंपन्यांचा बाजार हिस्सा 10.5% वरून 2022 च्या आर्थिक वर्षात 17.5% पर्यंत वाढला आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचा विश्वास आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा (पीएसयू) नफा आगामी काळात वाढणार आहे. त्यांचा असा दावा आहे की, मजबूत ऑर्डर बुक आणि कच्च्या मालाच्या उच्च किमती. तसेच, सरकार भारतात वस्तू बनवण्यावर आणि संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण करण्यावर भर देत आहे, ज्यामुळे PSU कंपन्यांना फायदा होईल आणि त्यांची कमाई आणि बाजार मूल्य आणखी वाढेल.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)