Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > २७ दिवसांत चांदी ₹१,१२,०८७ नं तर सोनं ₹२५,८३२ नं महागलं; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट्स

२७ दिवसांत चांदी ₹१,१२,०८७ नं तर सोनं ₹२५,८३२ नं महागलं; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Rate 27 Jan : सराफा बाजारामध्ये आज सोनं आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:33 IST2026-01-27T13:33:30+5:302026-01-27T13:33:50+5:30

Gold Silver Rate 27 Jan : सराफा बाजारामध्ये आज सोनं आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. पाहा काय आहेत नवे दर.

gold silver price 27 jan 2026 Silver rose by rs 112087 and gold by rs 25832 in 27 days Check today s latest rates | २७ दिवसांत चांदी ₹१,१२,०८७ नं तर सोनं ₹२५,८३२ नं महागलं; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट्स

२७ दिवसांत चांदी ₹१,१२,०८७ नं तर सोनं ₹२५,८३२ नं महागलं; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Rate 27 Jan : सराफा बाजारामध्ये आज सोनं आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. गेल्या शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात ४,७१७ रुपयांची तर चांदीच्या दरात २४,८०२ रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांचे डोळे विस्फारले असून बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

जीएसटीसह सोन्याचे आणि चांदीचे नवे दर 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनं (IBJA) जाहीर केलेल्या दरांनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १,६३,७९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीच्या किमतीनेही नवा उच्चांक गाठला असून जीएसटीसह चांदीचा भाव आता ३,५२,७८२ रुपये प्रति किलो झालाय. आज बाजार उघडताना जीएसटीशिवाय सोन्याचा दर १,५९,०२७ रुपये आणि चांदीचा दर ३,४२,५०७ रुपये प्रति किलो होता.

केवळ २७ दिवसांत किमतीत मोठी भर 

सोने आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. केवळ गेल्या दोन दिवसांचा विचार केला तर चांदी ४२,७९६ रुपयांनी आणि सोने ७,८९९ रुपयांनी महागलं. विशेष म्हणजे, २०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या केवळ २७ दिवसांत चांदीच्या दरात १,१२,०८७ रुपयांची आणि सोन्याच्या दरात २५,८३२ रुपयांची वाढ झाली आहे.

कॅरेटनुसार सोन्याच्या किमतीतील बदल 

२३ कॅरेट सोन्याचा दर आज ४,६९८ रुपयांनी वधारून जीएसटीसह १,६३,१४१ रुपये झाला. तर २२ कॅरेट सोनं, ज्याचा वापर दागिने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो, ते ४,३२१ रुपयांनी महाग होऊन जीएसटीसह १,५०,०३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलंय.

याशिवाय, १८ कॅरेट सोन्याच्या दरात ३,५३७ रुपयांची तेजी आली असून त्याचा जीएसटीसह दर १,२२,८४८ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २,७६० रुपयांच्या वाढीसह जीएसटीसह ९५,८२१ रुपयांवर पोहोचला. वरील सर्व किमतींमध्ये सध्या मेकिंग चार्जचा समावेश नाही. हे दर आयबीजेएन (IBJA) जारी केले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. 

Web Title : 27 दिनों में चांदी ₹1,12,087 और सोना ₹25,832 महंगा; आज के रेट चेक करें।

Web Summary : सोने और चांदी की कीमतों ने रिकॉर्ड तोड़ा। 27 दिनों में चांदी ₹1,12,087 और सोना ₹25,832 महंगा हुआ। 24 कैरेट सोना अब जीएसटी के साथ ₹1,63,797 प्रति 10 ग्राम, चांदी ₹3,52,782 प्रति किलो।

Web Title : Gold and silver prices soar in 27 days; check latest rates.

Web Summary : Gold and silver prices hit record highs. In 27 days, silver jumped ₹1,12,087, gold ₹25,832. 24-carat gold now ₹1,63,797 per 10 grams with GST, silver ₹3,52,782 per kg.