Gold Silver Price 20 Nov: लग्नाच्या या हंगामात एक दिलासादायक बातमी आहे. एका दिवसापूर्वी ज्या सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली होती, त्याचे दर जोरदार आपटले. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज ₹ १,००३ नं स्वस्त होऊन ₹ १,२२,८८१ प्रति १० ग्रॅमवर आला आहे. आता जीएसटीसह (GST) १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,२६,५६७ प्रति १० ग्रॅमवर आहे.
तर दुसरीकडे, आज चांदीचा दर जीएसटीशिवाय ₹ २,२८० ने घसरून ₹ १,५५,८४० प्रति किलो या दरानं उघडला. जीएसटीसह चांदीचा भाव ₹ १,६०,५१५ प्रति किलोवर आहे. यापूर्वी, बुधवारी चांदी जीएसटीशिवाय ₹ १,५८,१२० प्रति किलो आणि सोने जीएसटीशिवाय ₹ १,२३,८८४ प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
सर्वकालीन उच्चांकावरून मोठी घसरण
या घसरणीमुळे सोन्याच्या दरात मोठी सवलत मिळाली आहे. सोन्याचा भाव आता १७ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांक ₹ १,३०,८७४ पासून ₹ ७,९९३ नं स्वस्त झाला आहे. तर चांदीचे दर १४ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांक ₹ १,७८,१०० पासून ₹ २२,४६० नं खाली आले आहेत. या वर्षी मात्र सोन्याचा दर ₹ ४७,१४१ प्रति १० ग्रॅमनं महागला आहे, तर चांदी ₹ ६९,८२३ प्रति किलोनं वाढली आहे. आयबीजेए (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे अंदाजे सायंकाळी ५ वाजता दर जारी केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
आज २३ कॅरेट गोल्ड देखील ₹ ९९९ नं स्वस्त होऊन ₹ १,२२,३८९ प्रति १० ग्रॅमच्या दरावर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता ₹ १,२६,०६० झाली आहे. (यात मेकिंग चार्ज जोडलेला नाही)
तसंच, २२ कॅरेट गोल्डची किंमत ₹ ९१९ नं कमी होऊन ₹ १,१२,५५९ प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह हा दर ₹ १,१५,९३५ आहे. १८ कॅरेट गोल्ड ₹ ७५२ च्या घसरणीसह ₹ ९२,१६१ प्रति १० ग्रॅमवर आला आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत ₹ ९४,९२५ प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त, १४ कॅरेट गोल्डचा रेटही आज ₹ ७१,८८५ वर उघडला आणि जीएसटीसह ₹ ७४,०४१ आलाय.
