Lokmat Money >शेअर बाजार > जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?

जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?

GNG Electronics IPO: जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा आयपीओ २३ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि २५ जुलै रोजी बंद झाला. हा ४६०.४३ कोटी रुपयांचा बुक बिल्डिंग इश्यू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:01 IST2025-07-28T14:01:19+5:302025-07-28T14:01:19+5:30

GNG Electronics IPO: जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा आयपीओ २३ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि २५ जुलै रोजी बंद झाला. हा ४६०.४३ कोटी रुपयांचा बुक बिल्डिंग इश्यू आहे.

GNG Electronics IPO allotment status check GMP is indicating huge profits How to check if shares have been allotted | जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?

जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?

GNG Electronics IPO: जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा आयपीओ २३ जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि २५ जुलै रोजी बंद झाला. हा ४६०.४३ कोटी रुपयांचा बुक बिल्डिंग इश्यू आहे. हे ४०० कोटी रुपयांच्या १.६९ कोटी शेअर्सच्या नवीन इश्यू आणि ६०.४४ कोटी रुपयांच्या २६ लाख शेअर्सचा ऑफर फॉर सेलचं कॉम्बिनेशन आहे.

GNG इलेक्ट्रॉनिक्स IPO सबस्क्रिप्शन स्टेटस

या आयपीओला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. GNG इलेक्ट्रॉनिक्सचा IPO पहिल्या दिवशी ९.२० पट आणि दुसऱ्या दिवशी २७.५५ पट बुक झाला आणि शेवटच्या दिवशी एकूण सबस्क्रिप्शन १५०.२१ पट पोहोचलं. हा इश्यू रिटेल श्रेणीमध्ये ४७.३६ पट, एनआयआय श्रेणीमध्ये २२६.४४ पट आणि क्यूआयबी श्रेणीमध्ये २६६.२१ पट बुक झाला.

आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ जीएमपी

बाजार सूत्रांनुसार, अनलिस्टेड बाजारात GNG इलेक्ट्रॉनिक्स IPO GMP ९४ रुपये आहे, जो कॅप किंमतीपेक्षा ३९.६ टक्के जास्त आहे. या इश्यूचा उच्चांकी जीएमपी १०५ रुपये आहे. सध्याच्या जीएमपी आणि कॅप प्राइसच्या आधारे, जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ शेअर्सची अपेक्षित लिस्टिंग किंमत ३३१ रुपये असू शकते आणि गुंतवणूकदार चांगला नफा कमवू शकतात. जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओच्या शेअरचं वाटप २८ जुलै रोजी अंतिम केलं जाईल. २९ जुलै रोजी शेअर वाटप झालेल्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील आणि शेअर्स ३० जुलै रोजी बीएसई, एनएसईवर लिस्ट केले जातील.

अलॉटमेंट स्टेटस कसं पाहाल?

स्टेप १: बिगशेअर सर्व्हिसेसच्या वेबसाइटला भेट द्या (https://www.bigshareonline.com/ipo_Allotment.html).
स्टेप २: तीन सर्व्हर लिंक्सपैकी कोणत्याही एकावर क्लिक करा.
स्टेप ३: कंपनी सिलेक्शन ड्रॉपडाउनमध्ये कंपनीचं नाव निवडा.
स्टेप ४: सिलेक्शन टाईपमध्ये पॅनच्या डिटेल्स किंवा अर्ज क्रमांक किंवा इतर तपशील प्रविष्ट करा.
स्टेप ५: कॅप्चा एन्टर करा आणि शेअर वाटपाची स्थिती जाणून घेण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.

कंपनी कोणतं काम करते?

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी रिटेल आणि कॉर्पोरेट दोन्ही सेवा पुरवते. ते बहुतेकदा त्यांच्या ग्राहकांना रिफर्बिश्ड लॅपटॉप आणि डेस्कटॉप पुरवते. कंपनीचे उद्दिष्ट तंत्रज्ञान सुलभ, परवडणारं आणि दर्जेदार बनवण्याचं आहे.

(टीप- यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: GNG Electronics IPO allotment status check GMP is indicating huge profits How to check if shares have been allotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.