Lokmat Money >शेअर बाजार > १ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Gensol Engineering share price: मंगळवारी कंपनीचा शेअरही ५ टक्के लोअर सर्किटसह ८२.२० रुपयांवर घसरला. ही ५२ आठवड्यांची नवी नीचांकी किंमत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:48 IST2025-04-29T16:46:41+5:302025-04-29T16:48:07+5:30

Gensol Engineering share price: मंगळवारी कंपनीचा शेअरही ५ टक्के लोअर सर्किटसह ८२.२० रुपयांवर घसरला. ही ५२ आठवड्यांची नवी नीचांकी किंमत आहे.

Gensol Engineering share price more than 1 lakh investors in loss This stock fell by 92 percent now it has become difficult to sell | १ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Gensol Engineering share price:  संकटात सापडलेल्या जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअर्सला सलग १५ व्या ट्रेडिंग सेशनमध्ये लोअर सर्किट लागलंय. मंगळवारी कंपनीचा शेअरही ५ टक्के लोअर सर्किटसह ८२.२० रुपयांवर घसरला. ही ५२ आठवड्यांची नवी नीचांकी किंमत आहे. जेनसोलचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत ९० टक्क्यांनी घसरले आहेत. तर हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १,१२४ रुपयांच्या किमतीवरून ९३ टक्क्यांनी घसरलाय. दरम्यान, मार्च २०२५ च्या तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांनी या बुडालेल्या शेअरमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे आणि आता त्यांची गुंतवणूक यात अडकली आहे. नुकत्याच संपलेल्या मार्च तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येने १,००,००० चा टप्पा ओलांडला. जेनसोल इंजिनीअरिंगच्या प्रवर्तकांवर फसवणूक, आर्थिक फसवणूक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील त्रुटींचे आरोप करण्यात आले आहेत.

किरकोळ गुंतवणूकदार वाढले

कंपनीने शेअर केलेल्या ताज्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, मार्च तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या १३,४४३ नं वाढून १,०४,४५८ वर पोहोचली. दरम्यान, डिसेंबर २०२४ तिमाहीत हा आकडा ९१,०१५ होता. जसजशी भागधारकांची संख्या वाढत गेली, तसतशी किरकोळ गुंतवणूकदारांकडे असलेल्या शेअर्सची संख्याही वाढत गेली. किरकोळ भागधारकांनी मार्च तिमाहीत जेनसोल इंजिनीअरिंगचे २८,८८,३६३ शेअर्स खरेदी केले, ज्यामुळे कंपनीतील त्यांचा एकूण हिस्सा डिसेंबर २०२४ तिमाहीतील २३.४४% वरून मार्च २०२५ तिमाहीत ३०.६८% पर्यंत वाढला.

पाकसोबतचा व्यापार भारतीय थांबविणार, २६ राज्यांतील व्यापारी नेत्यांचा मोठा निर्णय

कंपनीतील प्रवर्तकाचा हिस्सा जवळपास निम्म्यावर आला असताना हा प्रकार घडला आहे. हा शेअर सातत्यानं लोअर सर्किटमध्ये अडकून केवळ एक्स्चेंजवर विक्री होत असल्यानं किरकोळ गुंतवणूकदारांना बाहेर पडणं अवघड झाले आहे.

प्रवर्तकांचा हिस्सा किती?

डिसेंबर तिमाहीपर्यंत प्रवर्तकांचा जेनसोल इंजिनीअरिंगमध्ये ६२.६५ टक्के हिस्सा होता, यापैकी अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी बंधूंकडे अनुक्रमे २१.२० टक्के आणि १८.३९ टक्के हिस्सा होता. तथापि, मार्च २०२५ तिमाहीच्या अखेरीस कंपनीतील प्रवर्तकाचा एकूण हिस्सा ३५.८७% पर्यंत घसरला, अनमोल सिंग जग्गी यांचा हिस्सा १२.३२% आणि पुनीत सिंग जग्गी यांचा हिस्सा १०.४७% पर्यंत खाली आला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Gensol Engineering share price more than 1 lakh investors in loss This stock fell by 92 percent now it has become difficult to sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.