GE Vernova T&D India Share Price: आजच्या कामकाजादम्यान जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियाच्या (GE Vernova T&D India) शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेअर ५ टक्क्यांच्या अप सर्किटसह उघडला आणि २,६०४.२५ रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. कंपनीनं जून २०२५ च्या तिमाहीत उत्कृष्ट आर्थिक निकाल जाहिर केले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. नफ्यात मोठी वाढ, ऑपरेशनल कामगिरीत सुधारणा आणि ऑर्डर बुकमध्ये मोठी वाढ यामुळे या पॉवर ट्रान्समिशन स्टॉकमध्ये मोठी खरेदी झाली.
नफा दुप्पट झाला
जून तिमाहीत जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियानं निव्वळ नफ्यात ११७.२% ने जबरदस्त वाढ नोंदवली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत १३४ कोटी रुपयांच्या तुलनेत २९१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचं परिचालन उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ९५८ कोटी रुपयांच्या होतं. ते आता वाढून १,३३० कोटी रुपये होते.
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
ऑपरेशनल कामगिरी देखील उत्कृष्ट
कंपनीची ऑपरेशनल कामगिरीदेखील उत्कृष्ट होती. अहवाल दिलेल्या तिमाहीत EBITDA मध्ये ११३.२% वाढ झाली. तो १८२ कोटी रुपयांवरून ३८८ कोटी रुपयांपर्यंत वाढला. यासोबतच, EBITDA मार्जिन देखील १९% वरून २९.१% पर्यंत वाढलं.
ऑर्डर बुकमध्ये ५७% वाढ
जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियाच्या ऑर्डर बुकमुळही बरेच गुंतवणूकदार आकर्षित झालेत. कंपनीला आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ₹१,६२० कोटी किमतीच्या नवीन ऑर्डर मिळाल्या, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ₹१,०३० कोटींपेक्षा ५७% या अधिक आहेत. कंपनला या ऑर्डर भारतीय आणि परदेशी बाजारपेठांमधून मिळाल्या आहेत.
५ वर्षात ३०००% परतावा
जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलंय. मंगळवारी झालेल्या तेजीसह, या शेअरनं ५२ आठवड्यांच्या नीचांकी १,२५२.८ रुपयांवरून १०८% चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जर आपण गेल्या पाच वर्षांबद्दल बोललो तर, या स्टॉकनं ३,०२०% इतका मोठा नफा दिलाय.
(टीप- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)