Lokmat Money >शेअर बाजार > लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी रांग, पहिल्याच दिवशी ₹७७ वर आला भाव; गुंतवणूकदारांना फटका

लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी रांग, पहिल्याच दिवशी ₹७७ वर आला भाव; गुंतवणूकदारांना फटका

GB Logistics IPO: कंपनीचे शेअर्स आज बीएसईवर डिस्काऊंटसह लिस्ट झाले. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचा शेअर १०२ रुपयांच्या आयपीओ किंमतीच्या तुलनेत ८१.६० रुपयांवर लिस्ट झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:03 IST2025-01-31T12:02:20+5:302025-01-31T12:03:47+5:30

GB Logistics IPO: कंपनीचे शेअर्स आज बीएसईवर डिस्काऊंटसह लिस्ट झाले. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचा शेअर १०२ रुपयांच्या आयपीओ किंमतीच्या तुलनेत ८१.६० रुपयांवर लिस्ट झाला.

GB Logistics IPO Queue to sell shares along with listing price hits rs 77 on first day Investors huge loss | लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी रांग, पहिल्याच दिवशी ₹७७ वर आला भाव; गुंतवणूकदारांना फटका

लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी रांग, पहिल्याच दिवशी ₹७७ वर आला भाव; गुंतवणूकदारांना फटका

GB Logistics IPO: जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचा आयपीओ (IPO) शुक्रवारी, ३१ जानेवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स आज बीएसईवर डिस्काऊंटसह लिस्ट झाले. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचा शेअर १०२ रुपयांच्या आयपीओ किंमतीच्या तुलनेत ८१.६० रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगनंतरही कंपनीच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. यासह तो ७७.५५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला.

आयपीओ २४ जानेवारीला खुला झाला

जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचा आयपीओ २४ जानेवारी रोजी खुला झाला आणि २८ जानेवारीला हा आयपीओ गुंतवणूकीसाठी बंद झाला. त्याची प्राइस बँड १०२ रुपये निश्चित करण्यात आली होती. तीन दिवसांत हा इश्यू १८५ पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा आयपीओ २५.०७ कोटी रुपयांचा आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यासाठी प्रस्तावित होते.

अधिक माहिती काय?

पब्लिक इश्यू पूर्णपणे २४.५७ लाख इक्विटी शेअर्सच्या आयपीओवर आधारित आहे. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत एन लखानी यांच्या म्हणण्यानुसार कंपनी इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर कर्जाची परतफेड, कार्यशील भांडवलाच्या गरजा, ट्रक चेसिस आणि ट्रक बॉडी खरेदीवरील खर्च आणि सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी करेल.

कंपनीचा व्यवसाय काय?

जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडची सुरुवात २०१९ मध्ये झाली असून कंपनी लॉजिस्टिक्स सेवा आणि सोल्यूशन्समध्ये सक्रिय आहे. कंपनी पात्र ड्रायव्हर आणि वाहनांच्या वैविध्यपूर्ण ताफ्यासह अनेक सेवा पुरवते. तसेच चार्टर नेटवर्कपर्यंतही एन्ट्री देते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: GB Logistics IPO Queue to sell shares along with listing price hits rs 77 on first day Investors huge loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.