Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकीची मोठी संधी; २० फेब्रुवारीला येतोय 'हा' IPO, किंमत फक्त ₹७९...

गुंतवणूकीची मोठी संधी; २० फेब्रुवारीला येतोय 'हा' IPO, किंमत फक्त ₹७९...

Gaudium IVF IPO: भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ही देशातील अशाप्रकारची पहिलीच कंपनी ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:32 IST2026-02-18T15:29:06+5:302026-02-18T15:32:41+5:30

Gaudium IVF IPO: भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ही देशातील अशाप्रकारची पहिलीच कंपनी ठरणार आहे.

Gaudium IVF IPO: Great investment opportunity; 'This' IPO is coming on February 20, price is only ₹79 | गुंतवणूकीची मोठी संधी; २० फेब्रुवारीला येतोय 'हा' IPO, किंमत फक्त ₹७९...

गुंतवणूकीची मोठी संधी; २० फेब्रुवारीला येतोय 'हा' IPO, किंमत फक्त ₹७९...

Gaudium IVF IPO: IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फर्टिलिटी सर्व्हिसेस देणारी गौडियम IVF अँड वुमेन्स हेल्थ आपला IPO घेऊन येत आहे. कंपनीने या इश्यूचा प्राइस बँड ₹७५ ते ₹७९ प्रति शेअर निश्चित केला असून, हा IPO २० फेब्रुवारी २०२६ पासून सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदार २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करू शकतील. खास बाब म्हणजे, भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ही देशातील पहिली फर्टिलिटी सर्व्हिसेस कंपनी ठरणार आहे.

IPO चे तपशील

इश्यू साइज: सुमारे ₹१६५ कोटी

फ्रेश इश्यू: ₹९० कोटी

ऑफर फॉर सेल (OFS): ₹७५ कोटी

OFS अंतर्गत प्रमोटर मणिका खन्ना आपली हिस्सेदारी विकणार आहेत

प्राइस बँड: ₹७५-₹७९ प्रति शेअर

लॉट साइज: १८९ शेअर्स

वरच्या प्राइस बँडनुसार किमान गुंतवणूक: ₹१४,९३१

सब्सक्रिप्शन कालावधी: २० ते २४ फेब्रुवारी २०२६

अँकर बुक: १८ फेब्रुवारी २०२६

शेअर अलॉटमेंट: २५ फेब्रुवारी २०२६ (अपेक्षित)

लिस्टिंग: ॅ७ फेब्रुवारी २०२६ (BSE आणि NSE वर)

ग्रे मार्केट संकेत

ग्रे मार्केटमध्ये सध्या या IPO ला ₹१२ चा प्रीमियम (GMP) मिळत आहे. यावरून शेअर इश्यू प्राइसपेक्षा सुमारे १६ टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होण्याचे संकेत मिळत आहेत.

SEBI मंजुरी

कंपनीने सप्टेंबर २०२५ मध्ये SEBI कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) पुन्हा सादर केला होता. त्याला जानेवारी २०२६ मध्ये मंजुरी मिळाली. कंपनीनुसार, फ्रेश इश्यूमधून उभारलेल्या निधीचा वापर पुढीलप्रमाणे होणार आहे...

₹५०कोटी: नवीन IVF सेंटर्स उभारणीसाठी

₹२९ कोटी: कर्जाची परतफेड किंवा प्री-पेमेंटसाठी

उर्वरित रक्कम: सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी

कंपनीचा व्यवसाय

गौडियम IVF अँड वुमेन्स हेल्थ ही भारतातील इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) तसेच इतर फर्टिलिटी उपचार देणारी अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचे ३० हून अधिक ठिकाणी सेंटर्स, 7 हब आणि 28 स्पोक मॉडेल आहेत. हे सर्व दिल्ली, मुंबई, लुधियाना, श्रीनगर, पटना, बंगळुरू अशा प्रमुख शहरांमध्ये आहे. IVF व्यतिरिक्त कंपनी ICSI, IUI, ओव्ह्युलेशन इंडक्शन यांसारख्या सेवा देते. प्रगत तंत्रज्ञान आणि पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट मॉडेलमुळे क्लिष्ट फर्टिलिटी केसेसमध्ये उच्च यशदरासाठी कंपनी ओळखली जाते.

(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : गॉडियम IVF IPO 20 फरवरी को खुलेगा: ₹79 पर निवेश का अवसर।

Web Summary : गॉडियम IVF का IPO 20 फरवरी को खुल रहा है, जिसकी कीमत ₹75-₹79 है। इस ₹165 करोड़ के IPO में फ्रेश इश्यू और ओएफएस शामिल हैं। जुटाई गई धनराशि से नए केंद्र और ऋण चुकाए जाएंगे। IVF सेवा प्रदाता BSE और NSE पर सूचीबद्ध होगा।

Web Title : Gaudium IVF IPO opens February 20: Investment opportunity at ₹79.

Web Summary : Gaudium IVF's IPO opens February 20, priced at ₹75-₹79. This ₹165 crore IPO includes fresh issue and OFS. Funds raised will fuel new centers and debt repayment. The IVF service provider will list on BSE and NSE.