Lokmat Money >शेअर बाजार > LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत

LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत

Upcoming IPOs : सध्या प्रायमरी मार्केट पूर्णपणे थंड आहे. पण येत्या काळात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. पाहा कोणत्या आहेत कंपन्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:36 IST2025-03-22T14:35:16+5:302025-03-22T14:36:52+5:30

Upcoming IPOs : सध्या प्रायमरी मार्केट पूर्णपणे थंड आहे. पण येत्या काळात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. पाहा कोणत्या आहेत कंपन्या.

From LG to Tata Capital these 5 companies are preparing to enter IPOs in the changing state of the stock market bse nse stock market | LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत

LG पासून टाटा कॅपिटलपर्यंत, शेअर बाजाराच्या बदलत्या स्थितीत 'या' ५ कंपन्यांचे IPO एन्ट्री घेण्याच्या तयारीत

Upcoming IPOs : सध्या प्रायमरी मार्केट पूर्णपणे थंड आहे. पण येत्या काळात अनेक बड्या कंपन्यांचे आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. या कंपन्यांच्या यादीत एनएसई, एनएसडीएल, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, बोट, एलटी, रिलायन्स जिओ, जेएसडब्ल्यू सिमेंट, एथर एनर्जी, झेप्टो, फोनपे, टाटा कॅपिटल आणि फ्लिपकार्ट यांचा समावेश आहे. अशा तऱ्हेनं या कंपन्यांचा आयपीओ आल्याने सेकंडरी मार्केटमध्येही हालचाल दिसण्याची शक्यता आहे.

मेनबोर्ड आयपीओ झाले कमी

सध्या शेअर बाजाराच्या बदललेल्या परिस्थितीमुळे मेनबोर्ड आयपीओंची संख्या कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रवर्तक आणि इन्व्हेस्टमेंट बँकर्स सध्या वेट अँड वॉचचा दृष्टिकोन अवलंबत आहेत. एफआयआयची विक्री कमी व्हावी, याकडेही या कंपन्यांचं लक्ष आहे, ट्रम्प यांची टॅरिफ योजना पूर्णपणे ज्ञात आहे. या सर्व मुद्द्यांवर स्पष्टता आल्यावर एखाद्या दिग्गज कंपनीच्या आयपीओची अपेक्षा करायला हवी. पुढील आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात अनेक कंपन्यांचे आयपीओ येऊ शकतात, असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

बाजार रिकव्हरी मोडवर

जागतिक बातारातील अस्थिरतेदरम्यानच, आता निफ्टीमध्ये सुधारणा दिसून येत आहे. ट्रेंड टेन्शन आणि अमेरिकेच्या धोरणामुळे जागतिक पातळीवर बाजारपेठेची स्थिती चांगली नाही. पण त्यानंतरही देशांतर्गत शेअर बाजारांनी चांगली कामगिरी केली आहे.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, एनएसडीएल, टाटा कॅपिटल, बीओटी आणि जेएसडब्ल्यू सिमेंट या टॉप पाच आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेनं वाट पाहत आहेत. एलजीच्या प्रस्तावित आयपीओमध्ये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून १०.१८ कोटी शेअर्सची विक्री केली जाऊ शकते.

(टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जागणार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: From LG to Tata Capital these 5 companies are preparing to enter IPOs in the changing state of the stock market bse nse stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.