Lokmat Money >शेअर बाजार > एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा

एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा

Dixon Technologies : कधीकाळी एका खोलीतून सुरू झालेली ही कंपनी आज जागतिक स्तरावर पोहचली आहे. आता चिनी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम राबवणार आहेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:13 IST2025-07-25T15:05:57+5:302025-07-25T16:13:31+5:30

Dixon Technologies : कधीकाळी एका खोलीतून सुरू झालेली ही कंपनी आज जागतिक स्तरावर पोहचली आहे. आता चिनी कंपनीसोबत संयुक्त उपक्रम राबवणार आहेय

From a Single Room to ₹1 Lakh Crore dixon technologies share price joint venture china company | एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा

एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा

Dixon Technologies : भारत आता केवळ सेवा क्षेत्रातच नव्हे, तर उत्पादन क्षेत्रातही वेगाने प्रगती करत आहे. या प्रवासात, कधीकाळी एका छोट्या खोलीतून सुरू झालेली एक भारतीय कंपनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे. ही कंपनी आहे डिक्सन टेक्नॉलॉजीज. शुक्रवारी बाजारात विविध बातम्यांचा ओघ सुरू असताना, डिक्सन टेक्नॉलॉजीजला चीनमधील एका मोठ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी सरकारची मंजुरी मिळाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

एका खोलीतून सुरू झालेला प्रवास ते १ लाख कोटी मार्केट कॅप
डिक्सन टेक्नॉलॉजीजची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. १९९३ मध्ये ही कंपनी एका लहानशा खोलीत सुरू झाली होती, जिथे ती फक्त रंगीत टीव्ही बनवत असे. मात्र, अथक परिश्रमाने आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे, कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात आपले नाव कमावले. आज डिक्सन चीन, कोरियासह अनेक देशांतील मोबाईल कंपन्यांसाठी असेंब्लीचे काम करते. त्यांच्या क्लायंट यादीमध्ये सॅमसंग आणि गुगल सारखी मोठी नावे आहेत. याशिवाय, कंपनी व्हिवो, शाओमी, ओप्पो यांसारख्या कंपन्यांसाठीही उत्पादने तयार करते.

शुक्रवारी, डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेडच्या शेअरची किंमत १७ हजार रुपयांच्या जवळपास होती. दुपारी हा शेअर १६,७४०.०० रुपयांवर व्यवहार करत होता, तर त्याने १६,९१० रुपयांची दिवसाची उच्चांकी पातळी गाठली होती. विशेष म्हणजे, कंपनीचे मार्केट कॅप आता एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

चिनी कंपनीसोबतचा मोठा प्रकल्प
डिक्सन टेक्नॉलॉजीजला चिनी प्रतिस्पर्धी लॉन्गचीअर सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी भारत सरकारकडून (MeitY - Ministry of Electronics and Information Technology) मंजुरी मिळाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, हा संयुक्त उपक्रम डिक्सन आणि लॉन्गचियरच्या सिंगापूर उपकंपनीमध्ये स्थापन केला जाईल.

या संयुक्त उपक्रम कंपनीचे नाव डिक्सटेल इन्फोकॉम असे असेल. यामध्ये डिक्सनकडे ७४ टक्के भागभांडवल असेल, तर लॉन्गचियरकडे २६ टक्के भागभांडवल असेल.

डिक्सटेल इन्फोकॉम काय करणार?
हा संयुक्त उपक्रम अनेक नवीन क्षेत्रांमध्ये उत्पादन आणि पुरवठ्याचा व्यवसाय करेल, ज्यात खालील उत्पादनांचा समावेश आहे

  • स्मार्ट फोन/टॅबलेट 
  • ट्रू वायरलेस स्टीरिओ
  • स्मार्ट घड्याळे
  • एआय पीसी
  • ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स
  • आरोग्यसेवा उपकरणे

वाचा - मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?

गेल्या पाच वर्षांत, डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना १०००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, ज्यामुळे ते मल्टीबॅगर ठरले आहेत. हा नवीन संयुक्त उपक्रम डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या वाढीला आणखी गती देईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: From a Single Room to ₹1 Lakh Crore dixon technologies share price joint venture china company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.