Lokmat Money >शेअर बाजार > आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत...

आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत...

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:30 IST2025-04-21T19:26:45+5:302025-04-21T19:30:10+5:30

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली आहे.

First fell 99%, now increased 1900%; Anil Ambani's Power shares are on the rise | आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत...

आधी 99% घसरले, आता 1900% वाढले; अनिल अंबानींचे पॉवर शेअर तेजीत...

Power Stock:अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये सोमवारी(21 एप्रिल) मोठी वाढ झाली आहे. आजच्या सत्रात या शेअर्सची किंमत बीएसईमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढून 44.65 रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, हे शेअर्स 99 टक्के घसरल्यानंतर गेल्या पाच वर्षांत 1900 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 54.25 रुपये आहे, तर निच्चांक 23.26 रुपये आहे.

1900% नी वाढले शेअर्स...
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरचे शेअर्स 23 मे 2008 रोजी 274.84 रुपयांवर होते. 24 एप्रिल 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 99 घसरुन 2.18 रुपयांवर आले. या पातळीपासून रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. कंपनीचे शेअर्स पाच वर्षांत 2.18 रुपयांवरुन 44.65 रुपयांवर पोहोचले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 1900 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सध्या रिलायन्स पॉवरचे मार्केट कॅप 17,700 कोटी रुपयांच्या पुढे असून, कंपनीही कर्जमुक्त झाली आहे.

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणुकीपूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: First fell 99%, now increased 1900%; Anil Ambani's Power shares are on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.