Share Market Top 5 Stocks : जीएसटी कपातीनंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर अचून स्टॉक्समध्ये पैसे गुंतवणे फार महत्त्वाचे आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संशोधन विभागाने या आठवड्यासाठी ५ प्रमुख कंपन्यांचा अभ्यास करून त्यांच्या कामगिरीवर आणि भविष्यातील शक्यतांवर आपले मत मांडले आहे. या कंपन्यांनी पहिल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे.
१. स्विगी - लक्ष्य किंमत : ५६० रुपये
स्विगीने पहिल्या तिमाहीत ४९.६ अब्ज रुपयांचा महसूल मिळवला, जो तिमाही-दर-तिमाही १२.५% वाढ दर्शवतो. फूड डिलिव्हरीमध्ये वार्षिक-दर-वार्षिक १८.७% वाढ झाली आहे. मात्र, कंपनीचा कॉन्ट्रिब्युशन मार्जिन आणि समायोजित एबिटडा मार्जिनमध्ये घट झाली. दुसरीकडे, इन्स्टामार्टचे एकूण ऑर्डर मूल्य १०७% नी वाढले आहे. सध्या या क्षेत्रात मोठी स्पर्धा असल्याने मोतीलाल ओसवालने तटस्थ (NEUTRAL) राहण्याचा सल्ला दिला आहे.
२. डिक्सन टेक्नॉलॉजी - लक्ष्य किंमत : २२,३०० रुपये
डिक्सन टेक्नॉलॉजीने पहिल्या तिमाहीत जोरदार कामगिरी केली. कंपनीचा महसूल, एबिटडा आणि करपश्चात नफा वार्षिक ९५%, ९५% आणि ६८% नी वाढला आहे. मोबाईल सेगमेंटमधील १२५% वाढ हे यामागचे प्रमुख कारण आहे. कंपनीची पुढील आर्थिक वर्षांसाठीची वाढीची योजना मजबूत असून, २०२८ पर्यंत महसूल, एबिटडा आणि पॅटमध्ये अनुक्रमे ३३%, ३६% आणि ४५% सीएजीआर वाढ अपेक्षित आहे.
३. हिंदुस्तान एरोनॉटिक्स - लक्ष्य किंमत : ५,८०० रुपये
हिंदुस्तान एरोनॉटिक्सने या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळवला असला तरी, मजबूत मार्जिनमुळे नफ्यात वाढ झाली. कंपनीचा एबिटडा मार्जिन २६.६% होता. तेजस एमके१ए साठी जीई इंजिनचा पुरवठा सुरू झाल्याने विमानांची डिलिव्हरी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असल्याने महसूलात २४% आणि नफ्यात १७% सीएजीआर वाढ अपेक्षित आहे. सध्या शेअर आकर्षक मूल्यांकनावर असून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
४. बायोकॉन - लक्ष्य किंमत : ४१० रुपये
बायोकॉनने मार्च २०२६ मध्ये सेमाग्लुटाइडच्या पेटंटची मुदत संपण्यापूर्वीच आपले उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीचा उद्देश हा वाढत्या मागणीनुसार उत्पादन वाढवणे आहे. बायोकॉन या उत्पादनासाठी 'सीडीएमओ' आणि 'फ्रंट-एंड' दोन्ही मॉडेल्सवर काम करत आहे. कंपनीची उत्पादन वाढवण्याची योजना आणि सिन्जेन सारख्या उपकंपन्यांची वाढ पाहता बायोलॉजिक्स, जेनेरिक्स आणि सिन्जेनमध्ये अनुक्रमे १८%, १६% आणि १०% वार्षिक विक्री वाढ अपेक्षित आहे.
वाचा - आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
५. आयसीआयसीआय बँक - लक्ष्य किंमत : १,६७० रुपये
आयसीआयसीआय बँकेने पहिल्या तिमाहीत १५.५% वार्षिक नफा वाढ नोंदवली. बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन ४.३४% स्थिर राहिले. बँकेच्या ॲडव्हान्समध्ये ११.५% आणि ठेवीमध्ये १२.८% वाढ झाली आहे. बँकेचा ताळेबंद मजबूत असून, एकूण आणि निव्वळ नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स अनुक्रमे १.६७% आणि ०.४१% च्या कमी पातळीवर आहेत. तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि वैयक्तिक कर्जाची मजबूत मागणी पाहता, बँकेसाठी २०२७ पर्यंत २.३% आरओए आणि १७.३% आरओई अपेक्षित आहे.
शेअरचे नाव | सीएमपी (रु) | लक्ष्य किंमत (रुपये) | वाढ (%) |
स्विगी | ४२५ | ५६० | ३२ |
डिक्सन टेक्नॉलॉजी | १७९८५ | २२,३०० | २४ |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स | ४७९५ | ५,८०० | २१ |
बायोकॉन | ३५८ | ४१० | १५ |
आयसीआयसीआय बँक | १४१९ | १६७० | १८ |
टीप : ही माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संशोधन अहवालावर आधारित आहे. शेअर बाजारातीलगुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.