Lokmat Money >शेअर बाजार > नफा मिळेल म्हणून झटपट शेअर्स विकू नका! नियम बदललेत; समजून घ्या अन् योग्य फायदा घ्या...

नफा मिळेल म्हणून झटपट शेअर्स विकू नका! नियम बदललेत; समजून घ्या अन् योग्य फायदा घ्या...

शेअर्स काही महिन्यांसाठी विक्री न करण्याचा एक छोटासा निर्णय तुमचा कर मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:36 IST2025-08-17T13:33:38+5:302025-08-17T13:36:29+5:30

शेअर्स काही महिन्यांसाठी विक्री न करण्याचा एक छोटासा निर्णय तुमचा कर मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो.

Don't sell shares just because you want to make a profit! The rules have changed; understand and take advantage of them... | नफा मिळेल म्हणून झटपट शेअर्स विकू नका! नियम बदललेत; समजून घ्या अन् योग्य फायदा घ्या...

नफा मिळेल म्हणून झटपट शेअर्स विकू नका! नियम बदललेत; समजून घ्या अन् योग्य फायदा घ्या...

चंद्रकांत दडस, वरिष्ठ उपसंपादक

तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करता आणि नफा होताच 'विक्री' बटण दाबता का? उत्तर जर 'हो' असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा अनेक जण पैसे कमविण्याच्या शर्यतीत कमी नफा असतानाही गुंतवणूक काढून घेतात. मात्र, यामुळे तुम्ही कराच्या जाळ्यात अडकू शकता. शेअर्स काही महिन्यांसाठी विक्री न करण्याचा एक छोटासा निर्णय तुमचा कर मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो.

कर बदल समजून घ्या

अल्पकालीन भांडवली नफ्यावर (एसटीसीजी) वाढलेला कर: पूर्वी एसटीसीजीयर १५% कर आकारला जात होता, आता तो २०% पर्यंत वाढविण्यात आला आहे. जर तुमचे एकूण उत्पन्न रिबेट मयदित असेल (जुन्या पद्धतीत ५ लाख रुपये, नवीन पद्धतीत ७ लाख रुपये किंवा आर्थिक वर्ष २५-२६ पासून १२ लाख रुपये) आणि त्यात एसटीसीजीचा समावेश असेल, तर तुम्हाला त्या एसटीसीजीवर कर भरावा लागेल.

छोट्या नफ्यावरही कराचा बोजा
१. २०,००० रुपये नफा असेल तर त्यावर तब्बल ४ हजार रुपयांचा कर लागतो. समजा, तुम्ही एका शेअरमध्ये गुंतवणूक केली व २० हजारांचा अल्पकालीन भांडवली नफा मिळवला तर तुम्हाला ४ हजार हजारांचा कर लागेल.

२. आतापर्यंत तुम्हाला वाटले असेल की लहान उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही; परंतु, आता तसे नाही. ३६५ दिवसांपूर्वी तुम्ही स्टॉक विकला म्हणून ४ हजार रुपये कर आकारला जातो.

या गोष्टी लक्षात ठेवा : ३६५ दिवसांपेक्षा जास्त काळ शेअर्स होल्ड करून ठेवल्यास तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. जर तुम्ही ३६५ दिवसांपेक्षा जास्त काळ (१ वर्ष) शेअर्स विकले नाहीत तर तुम्हाला १,२५,००० पर्यंत करसवलत मिळेल. त्यामुळे शेअर बाजारात प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. नफा मिळविणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच नफा वाचविणेही महत्त्वाचे आहे.

Web Title: Don't sell shares just because you want to make a profit! The rules have changed; understand and take advantage of them...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.