Lokmat Money >शेअर बाजार > DMart च्या शेअर्समध्ये १५% ची जोरदार उसळी; गुंतवणूकदार मालामाल, कारण काय?

DMart च्या शेअर्समध्ये १५% ची जोरदार उसळी; गुंतवणूकदार मालामाल, कारण काय?

Dmart Avenue Supermarts Ltd Share Price : रिटेल क्षेत्रातील दिग्गज डीमार्ट चेन चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ झाली. काय आहे यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:32 IST2025-01-03T13:32:21+5:302025-01-03T13:32:21+5:30

Dmart Avenue Supermarts Ltd Share Price : रिटेल क्षेत्रातील दिग्गज डीमार्ट चेन चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ झाली. काय आहे यामागचं कारण?

Dmart Avenue Supermarts Ltd shares surge by 15 percent Investors are getting huge profit what is the reason | DMart च्या शेअर्समध्ये १५% ची जोरदार उसळी; गुंतवणूकदार मालामाल, कारण काय?

DMart च्या शेअर्समध्ये १५% ची जोरदार उसळी; गुंतवणूकदार मालामाल, कारण काय?

Dmart Avenue Supermarts Ltd Share Price : रिटेल क्षेत्रातील दिग्गज डीमार्ट चेन चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सच्या शेअरमध्ये (Avenue Supermarts Ltd Share Price) आज मोठी वाढ झाली. तिसऱ्या तिमाहीच्या अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा स्टँडअलोन महसूल १७ टक्क्यांनी वाढून १५,५६५.२३ कोटी रुपये झालाय, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १३,२४७.३३ कोटी रुपये होता.

आज १५ टक्क्यांनी वाढ

आज आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एव्हेन्यू सुपरमार्टलिमिटेडचा शेअर (Avenue Supermarts Ltd Share) ३,८४० रुपयांवर ट्रेडिंगसाठी उघडला, तर काही काळानंतर तो इंट्राडेचा उच्चांक म्हणजेच १५ टक्क्यांच्या तेजीसह ४,१६५.९० रुपयांवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीची एकूण ३८७ स्टोअर्स होती.

महसूल वाढला

एव्हेन्यू सुपरमार्टचा स्टँडअलोन निव्वळ नफा ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ८ टक्क्यांनी वाढून ७१०.३७ कोटी रुपये झाला आहे. त्याचवेळी कंपनीचं कामकाजातून मिळणारं उत्पन्न १४,०५०.३२ कोटी रुपये झालंय, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील १२,३०७.७२ कोटी रुपयांच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, आजच्या तेजीनंतर हा आकडा वाढलाय.

गेल्या वर्षभरात एव्हेन्यू सुपरमार्टच्या (डीमार्ट) शेअरमध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, तर निफ्टीमध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले, तर गेल्या ६ महिन्यांत शेअर १५ टक्क्यांनी घसरलेत. तर, वर्षभराच्या कालावधीत २ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Dmart Avenue Supermarts Ltd shares surge by 15 percent Investors are getting huge profit what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.