डिक्सन टेक्नोलॉजीजने (Dixon Technologies) आज मंगळवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे परिणाम जाहीर केले. जून तिमाहीत कंपनीला जबरदस्त नफा झाला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 100% पर्यंत वाढला आहे. कंपनीने जून 2025 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी 280.02 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. जो गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या 139.70 कोटी रुपयांच्या तुलनेत वार्षिक आधारावर 100% आहे.
इतर डिटेल्स -
जून तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) ४८४ कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या २५६ कोटी रुपयांच्या तुलनेत ८९% अधिक आहे. कंपनीचे निव्वळ कर्ज जून २०२५ च्या अखेरीस २१४ कोटी रुपयांपर्यंत वाढले. हे मार्च २०२५ पर्यंत ६२ कोटी रुपयांचे होते. या तिमाहीत डिक्सनचे करोत्तर प्रॉफिट मार्जिन २.२% एवढे होते. जे गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत 2.1% च्या तुलनेत 10 आधार अंकांची वृद्धी दर्शवते.
अशी आहे शेअरची स्थिती -
कंपनीचा शेअर बीएसईवर उत्पन्नाची घोषणा होण्यापूर्वी, १% ने घसरून १६,११२.२० रुपयांवर बंद झाला होता. आता बुधवारी हा शेअर फोकसमध्ये राहू शकतो. २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये ४.७% वाढ झाली आहे तर गेल्या सहा महिन्यांत ७.६% वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १९,१४९.८० रुपये आहे तर ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १०,६१३ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ९७,४८१.८९ कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)