DAM Capital Advisors Share Price : डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सच्या शेअरची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. कंपनीचे शेअर्स ३८.८७ टक्क्यांच्या प्रीमियमसह नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (NSE) ३९३ रुपयांवर लिस्ट झाले आहेत. तर मुंबई शेअर बाजारात (BSE) कंपनीचे शेअर्स ३८.८३ टक्क्यांच्या प्रीमियमसह ३९२.९० रुपयांवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सच्या शेअरची किंमत २८३ रुपये होती. कंपनीची एकूण इश्यू साइज ८४०.२५ कोटी रुपयांपर्यंत होती. हा आयपीओ १९ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि २३ डिसेंबरपर्यंत खुला होता.
लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये वाढ
लिस्टिंगनंतर डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सच्या शेअर्समध्ये तेजी आली. बीएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून ४५६.९० रुपयांवर पोहोचला. एनएसईवर कंपनीचा शेअर १५ टक्क्यांहून अधिक वधारून ४५६.९० रुपयांवर पोहोचला होता. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ४५.८८ टक्के होता, तो आता ४१.५ टक्क्यांवर आला आहे. धर्मेश अनिल मेहता, सोनाली धर्मेश मेहता आणि बूमबकेट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
८१ पटींहून अधिक सबस्क्राइब
डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सच्या आयपीओ एकूण ८१.८८ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २६.८ पट सब्सक्राइब झाला. तर कर्मचारी वर्गात एकूण ४०.०९ पट सबस्क्रिप्शन मिळालं. डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सच्या आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) श्रेणीत ९८.४७ पट, तर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा १६६.३३ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकणार होते. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये ५३ शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,९९९ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)