Dam Capital Advisors IPO GMP : इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेडचा आयपीओ तिसऱ्या दिवशी १३.११ पट सब्सक्राइब झाला आहे. याआधी शुक्रवारी आयपीओमध्ये २,०८,०४,६३२ शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत १४,५२,५४,५०३ शेअर्सची बोली लागली होती.
सोमवारी शेवटच्या दिवशी आतापर्यंत नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा २८.०१ पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणुकदारांचा हिस्सा १३.४० पट सब्सक्राइब झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सची श्रेणी १.३६ पट सब्सक्राइब झाली.
डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्सने अँकर गुंतवणूकदारांकडून २५१ कोटी रुपये उभे केले आहेत. आयपीओसाठी २६९ ते २८३ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. आयपीओ गुंतवणूकीसाठी आज संध्याकाळी ५ वाजता बंद होईल. हा आयपीओ पूर्णपणे प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांच्या २.९७ कोटी इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलवर (OFS) वर आधारित आहे.
DAM Capital Advisors IPO
डॅम कॅपिटल अॅडव्हायझर्सचा आयपीओ लिस्ट होण्यापूर्वी सोमवारी ग्रे मार्केटमध्ये १६० रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. हे २८३ रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या वरच्या लेव्हलवर ५५% ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) दर्शवते.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)