Lokmat Money >शेअर बाजार > Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर

Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर

Crizac IPO Allotment Status Date: क्रिझॅक लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ ऑफर २ जुलै रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली आणि ४ जुलैपर्यंत खुली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:19 IST2025-07-07T14:19:41+5:302025-07-07T14:19:41+5:30

Crizac IPO Allotment Status Date: क्रिझॅक लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ ऑफर २ जुलै रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली आणि ४ जुलैपर्यंत खुली होती.

Crizac IPO Allotment Status 60 times subscription have the shares been allotted how to check GMP on premium | Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर

Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर

Crizac IPO Allotment Date: क्रिझॅक लिमिटेडच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओ ऑफर २ जुलै रोजी गुंतवणूकीसाठी खुली झाली आणि ४ जुलैपर्यंत खुली होती. हा आयपीओ जवळपास ६० पट सब्सक्राइब झाला होता. त्याचबरोबर शेअर वाटपावर आज अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या पब्लिक ऑफरच्या माध्यमातून ८६० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. हा आयपीओ निव्वळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे. अशा परिस्थितीत आयपीओच्या माध्यमातून उभा केलेला पैसा कंपनीला मिळणार नाही. ही रक्कम भागधारकांना मिळणार आहे.

Crizac IPO Subscription Status

क्रिझॅकच्या आयपीओला क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत एकूण १३४.३५ पट, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) सेगमेंटमध्ये ७६.१५ पट बोली लागली. तर, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १०.२४ पट सबस्क्रिप्शन मिळालं. पहिल्या दिवशी केवळ ०.४८ पट बोली आल्या, तर दुसऱ्या दिवशी २.८९ पट बोली आल्या. यानंतर शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे गुंतवले. कंपनीनं आयपीओचा प्राइस बँड २३३ ते २४५ रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ६१ शेअर्स खरेदी करण्यासाठी १४,९४५ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई

काय करते कंपनी?

क्रिझॅक लिमिटेड (Crizac IPO) हा एक बी२बी शिक्षण प्लॅटफॉर्म आहे. त्याची स्थापना २०११ मध्ये झाली. ही कंपनी युनायटेड किंग्डम, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी स्टुडंट रिक्रुटमेंट सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून काम करते. कंपनीच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंत, जगभरात त्यांचे सुमारे ७,९०० एजंट आहेत, तर त्यांनी ५.९५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रोसेस केलेत. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ९५ टक्के उत्पन्न लंडनमधून येतं.

BSE वर कसं पाहाल स्टेटस?

१.सर्वप्रथम बीएसईच्या अधिकृत वेबसाइट https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर जा.
२.यानंतर इश्यू टाईपमध्ये 'इक्विटी' निवडा.
३.ड्रॉपडाउन मेनूमधून 'क्रिझॅक लिमिटेड' निवडा.
४.यानंतर तुमचा अर्ज क्रमांक किंवा पॅन क्रमांक एन्टर करा.

रजिस्ट्रार वेबसाईटवर कसं पाहाल?

१. रजिस्ट्रारच्या वेबसाइट https://in.mpms.mufg.com/Initial_Offer/public-issues.html ला भेट द्या.
२. ड्रॉपडाउनमधून क्रिझॅक लिमिटेड - IPO निवडा.
३. पॅन, अर्ज क्रमांक, डिमॅट खाते क्रमांक किंवा खाते क्रमांक/IFSC कोड एन्टर करा.
४. सबमिट बटणावर क्लिक करून स्टेटल तपासा.

GMP किती?

आज म्हणजेच ७ जुलै सकाळी, क्रिझॅक आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) ४३ रुपये होता. अशा परिस्थितीत, शेअर्सची लिस्टिंग २८८ रुपयांवर होऊ शकते. ही किंमत आयपीओच्या २४५ रुपयांच्या अपर प्राईज बँडपेक्षा १७.५५% जास्त आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Crizac IPO Allotment Status 60 times subscription have the shares been allotted how to check GMP on premium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.