Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

Commercial LPG Shortage : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेचा भारतातील अन्न सेवा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत असून त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:55 IST2026-03-10T14:28:28+5:302026-03-10T14:55:39+5:30

Commercial LPG Shortage : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेचा भारतातील अन्न सेवा क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होत असून त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येत आहे.

Commercial LPG Shortage Hits India’s Food Sector: QSR Stocks Slide Amid Supply Crisis | हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

हॉटेल-रेस्टॉरंटना गॅसचा 'दणका'! कमर्शियल LPG च्या तुटवड्यामुळे 'फूड' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले

Commercial LPG Shortage : देशातील फूड सर्व्हिस क्षेत्रावर सध्या संकटाचे सावट पसरले आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बेंगळुरू, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने याचा थेट फटका शेअर बाजारातील दिग्गज फूड कंपन्यांच्या शेअर्सना बसला आहे.

संकट नेमके काय आहे?
५ मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची भाषा अस्पष्ट असल्याने वितरकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि त्यांनी कमर्शियल सिलिंडरचा पुरवठा थांबवला. 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया'च्या मते, रेस्टॉरंट्सकडे आता केवळ एक आठवड्याचा साठा उरला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर अनेक रेस्टॉरंट्स बंद पडण्याची किंवा मेन्यू मर्यादित करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेअर बाजारातील पडझड
रेस्टॉरंट्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सच्या व्यवसायावर परिणाम होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.
ज्युबिलंट फूडवर्क्स : ०.९८% घसरण.
देवयानी इंटरनॅशनल : ०.०९% घसरण.
एटरनल (झोमॅटो) : १% घसरण.
वेस्टलाईफ फूडवर्ल्ड : यांसह इतर अनेक फूड क्षेत्रातील शेअर्स लाल निशाणात बंद झाले आहेत.

अमेरिका-कॅनडातून होणार आयात
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. सूत्रानुसार, गॅसची कमतरता भरून काढण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा येथून अतिरिक्त एलपीजी आयात करण्याची तयारी सुरू आहे. तसेच, रेस्टॉरंट्स आणि ऑटो क्षेत्राच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने एका विशेष समितीची स्थापना केली आहे.

वाचा - भारतावर गॅस रेशनिंगची वेळ! युद्धाच्या धगीमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडर बुकिंगसाठी नवीन नियम

उद्योगावर काय परिणाम होईल?
रेस्टॉरंट्स पूर्ण क्षमतेने चालली नाहीत, तर लाखोंच्या रोजगारावर गदा येऊ शकते.
पुरवठा साखळीतील या अडथळ्यामुळे पुढील ३० ते ६० दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title : कमर्शियल एलपीजी की कमी से रेस्टोरेंट प्रभावित; खाद्य कंपनियों के शेयर गिरे

Web Summary : कमर्शियल एलपीजी की कमी से भारत का खाद्य सेवा क्षेत्र खतरे में है, जिससे रेस्टोरेंट प्रभावित हैं और प्रमुख खाद्य कंपनियों के शेयरों में गिरावट आई है। सीमित गैस आपूर्ति से बंदी और मेनू प्रतिबंधों का डर है। सरकार संकट को कम करने के लिए अमेरिका, कनाडा से आयात करना चाहती है।

Web Title : Commercial LPG Shortage Hits Restaurants; Food Company Shares Plunge

Web Summary : A commercial LPG shortage threatens India's food service sector, impacting restaurants and triggering a stock market dip for major food companies. Limited gas supply prompts fears of closures and menu restrictions. Government seeks imports from US, Canada to ease the crisis, potentially averting job losses and price hikes.