Multibagger stock: कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज ४३ वा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागत आहे. पण त्यानंतरही कंपनीच्या शेअर्सची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. आज कंपनीच्या शेअर्सना २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलंय. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ६९.२१ रुपयांच्या पातळीवर पोहोचलीये.
२ महिन्यांत १६९% वाढ
१७ जून रोजी कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअरची किंमत २५.६८ रुपयांच्या पातळीवर होती. आज हा शेअर ६९.२१ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. म्हणजेच, फक्त २ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७६.१८ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५.४२ रुपये आहे. कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सच्या किमतीत ५२ आठवड्यांच्या नीचांकापेक्षा ११७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप १४११.८८ कोटी रुपये आहे.
GST मध्ये बदल झाल्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का? सिगरेट आणि दारू महागणार
अंतरिम लाभांशाची घोषणा
टेक, स्पोर्ट्स आणि गेमिंग कंपनीनं १३ ऑगस्ट रोजी तिमाही निकाल जाहीर केले. त्याच दिवशी कंपनीनं अंतरिम लाभांशही जाहीर केला. एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, कोलॅब प्लॅटफॉर्म्सने म्हटलंय की, वार्षिक आधारावर नफा (कर भरल्यानंतर) १६७ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा नफा १२०.२५ लाख रुपये झालाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत ४५.१९ लाख रुपये नफा झाला होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर कंपनीचा नफा २६ टक्क्यांनी वाढलाय. कंपनीचा महसूल २३०६.२८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल १११८.९४ कोटी रुपये होता.
किती लाभांश देणार
या कंपनीनं प्रति शेअर ०.०१ रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी कंपनीचे शेअर्स २ भागांमध्ये विभागले गेले होते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)