Lokmat Money >शेअर बाजार > ₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल

₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल

कॉफी डे एंटरप्रायझेजच्या शेअर होल्डींगमध्ये गेल्या पाच दिवसांत जवळफास 16 टक्के आणि गेल्या सहा मिहिन्यांत 46 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:55 IST2025-07-16T17:54:13+5:302025-07-16T17:55:30+5:30

कॉफी डे एंटरप्रायझेजच्या शेअर होल्डींगमध्ये गेल्या पाच दिवसांत जवळफास 16 टक्के आणि गेल्या सहा मिहिन्यांत 46 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. 

Coffee Day shares went straight from rs 350 to rs 19, now on upper circuit of 10 percent It is making a fortune | ₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल

₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल

शेअर बाजारातील कॉफी डे एंटरप्राइझेसच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 10 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. याच बरोबर हा शेअर 39.86 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला आहे. खरेतर एका मोठ्या खरेदीनंतर या शेअर मध्ये ही तेजी आली आहे. दिग्गज निवेशक डॉली खन्ना यांनी या शेअर्सचा मोठा भाग खरेदी केला आहे.

असे आहेत डिटेल्स -
कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एप्रिल-जून तिमाहीच्या अखेरीस खन्ना यांचा कॉफी डे एंटरप्रायझेसमध्ये १.५५ टक्के हिस्सा आहे. जो ३२.७८ लाख शेअर्स एवढा आहे. शेयरहोल्डिंग पॅटर्नच्या आकडेवारीनुसार, जून 2025 तिमाहीपर्यंत डॉली खन्ना यांच्याकडे 32,78,440 शेअर आहेत. जे कॉफी डे एंटरप्राइजेजमध्ये  1.55% हिस्सेदारीच्या बरोबरीचे आहेत.

शेअरची स्थिती -
कॉफी डे एंटरप्रायझेजच्या शेअर होल्डींगमध्ये गेल्या पाच दिवसांत जवळफास 16 टक्के आणि गेल्या सहा मिहिन्यांत 46 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. 

या वर्षात, म्हणजेच 2025 मध्ये आतापर्यंत हा शेअर 68 टक्क्यांनी वधारला आहे. मात्र दीर्घकाळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. महत्वाचे म्हणजे, १२ जानेवारी २०१८ रोजी या शेअरची किंमत सुमारे ३५० रुपये होती. यानंतर केवळ दोनच वर्षांत म्हणजेच २०२० मध्ये, थेट १९ रुपयांवर आला होता. अर्थात गेल्या दोन वर्षांत हा शेअर जवळपास 95% ने घसरला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Coffee Day shares went straight from rs 350 to rs 19, now on upper circuit of 10 percent It is making a fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.