Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ

शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ झाली. ऑटो इंडेक्समध्ये ३.५ टक्के आणि आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची वाढ दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:10 IST2025-01-02T16:09:24+5:302025-01-02T16:10:24+5:30

Share Market Update : बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ झाली. ऑटो इंडेक्समध्ये ३.५ टक्के आणि आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची वाढ दिसून आली.

closing bell sensex jumps 1436 points today nifty closed above 24100 | शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ

शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : नवीन वर्षाच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजारात चांगली वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवार हा निफ्टीसाठी २०२५ चा पहिला एक्सपायरी दिवस होता, ज्यामध्ये बाजाराने खालच्या स्तरावरून मोठी झेप घेतली. निफ्टी-सेन्सेक्स आज एका सत्रात सुमारे २% च्या वाढीसह कार्यरत दिसले. आजच्या वाढीनंतर, BSE वर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात सुमारे ५.९ लाख कोटींची वाढ झाली आहे.

कोणत्या सेक्टरमध्ये काय घडलं?
बीएसईचे सर्व सेक्टर या दिवशी खरेदीने बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. जर आपण क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर ऑटो आणि आयटी समभागांमध्ये चांगली वाढ झाली. बँकिंग, PSE, तेल आणि वायू निर्देशांक वाढीने बंद झाले. आज मेटल आणि रियल्टी निर्देशांकात वाढ झाली. मात्र, बाजारातील वाढीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया खालच्या पातळीवर बंद झाला. रुपया १० पैशांनी कमजोर होऊन ८५.७५ वर बंद झाला.

शेअर बाजारातील टॉप गेनर्स
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) बेंचमार्क सेन्सेक्स १,४३६.३० अंकांनी वाढून ७९,९४३.७१ वर बंद झाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निफ्टी ४४५.७५ अंकांनी वाढून २४,१८८.६५ वर बंद झाला. आजच्या व्यवहारात सुमारे २३१२ शेअर्स वाढले तर १४९६ शेअर्समध्ये घट झाली आणि १०८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय, निफ्टीमध्ये बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, श्रीराम फायनान्स हे टॉप गेनर्स होते, तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सन फार्मा यांच्या घसरण पाहायला मिळाली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक मजबूत
गुरुवारी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ झाली. ऑटो इंडेक्समध्ये ३.५ टक्के आणि आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये जोरदार खरेदी, आगामी तिमाही कमाईकडे सकारात्मक आणि आश्वासक तांत्रिक दृष्टीकोन यामुळे बाजारातील आजची वाढ दिसून आली.

Web Title: closing bell sensex jumps 1436 points today nifty closed above 24100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.