Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा

बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा

कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २४:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. अर्थात, कंपनीने प्रत्येक १ शेअरमागे २४ बोनस शेअर्स दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 19:15 IST2025-12-15T19:13:59+5:302025-12-15T19:15:14+5:30

कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २४:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. अर्थात, कंपनीने प्रत्येक १ शेअरमागे २४ बोनस शेअर्स दिले आहेत.

Bumper gift multibagger apis india multibagger company distributed 24 bonus shares, making investors rich; gave more than 6100 Percent return | बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा

बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा

एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील कंपनी एपिस इंडियाने (Apis India) आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २४:१ या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. अर्थात, कंपनीने प्रत्येक १ शेअरमागे २४ बोनस शेअर्स दिले आहेत.

शेअर्समध्ये ६१००% चा जबरदस्त परतावा -
एपिस इंडियाच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत म्हणजेच १३ ऑक्टोबर २०२२ पासून आतापर्यंत तब्बल ६,१०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी केवळ ८१ पैशांवर असलेला हा शेअर १० डिसेंबर २०२५ रोजी ₹ ५०.८० वर बंद झाला. गेल्या ३ वर्षांत कंपनीच्या शेअर्सने तब्बल ४,८३२% ची तेजी दिसून आली आहे. तर दोन वर्षांचा विचार करता कंबनीचा  शेअर १,३७२% ने वधारला आहे. गेल्या ८ महिन्यांत या शेअरने ३५३% एवढा परतावा दिला आहे. तर ३ महिन्यांत १२९% चा परतावा दिला आहे.

दुसऱ्यांदा दिले बोनस शेअर्स -
महत्वाचे म्हणजे, एपिस इंडियाने यापूर्वीही बोनस शेअर्स दिले आहेत. डिसेंबर २०१० मध्ये कंपनीने ३२३:१०० या प्रमाणात बोनस शेअर्स वाटले होते. म्हणजेच, १०० शेअर्सवर ३२३ बोनस शेअर्स दिले होते. सध्या कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) सुमारे ₹ ७०० कोटी पर्यंत असून, कंपनीच्या प्रवर्तकांचा (Promoters) हिस्सा ७४.७२% आहे. तर सार्वजनिक हिस्सेदारी २५.२८% आहे.

या क्षेत्रात कार्यरत आहे कंपनी -
एपिस इंडिया, मध (Honey), खजूर, फ्रूट जॅम, सेरेल्स, सॅफ्रन, आले-लसूण पेस्ट (Ginger Garlic Paste) सह विविध उत्पादने विकते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title : एपिस इंडिया का बंपर बोनस: प्रति शेयर 24 शेयर, 6100% रिटर्न!

Web Summary : एफएमसीजी कंपनी एपिस इंडिया ने निवेशकों को 24:1 बोनस शेयर दिए, जिससे अक्टूबर 2022 से 6100% से अधिक रिटर्न मिला। शेयर ₹0.81 से बढ़कर ₹50.80 हो गए, जो महत्वपूर्ण वृद्धि दर्शाता है। कंपनी ने पहले 2010 में बोनस शेयर जारी किए थे और विभिन्न उत्पाद पेश करती है।

Web Title : Apis India's bumper bonus: 24 shares per share, 6100% return!

Web Summary : FMCG company Apis India gifted investors 24:1 bonus shares, delivering over 6100% returns since October 2022. Shares rose from ₹0.81 to ₹50.80, marking significant growth. The company previously issued bonus shares in 2010 and offers diverse products.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.