BSE share price: या वर्षी जूनमध्ये बीएसईचा (BSE) शेअर एनएसईवर ३०३० रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. परंतु या विक्रमी उच्चांकानंतर हा मल्टीबॅगर स्टॉक नफा वसुलीचा बळी ठरला.
शुक्रवारी बीएसईचे शेअर्स २०४७.९० रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या ४ महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किमतीत विक्रमी उच्चांकावरून ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. अलीकडेच कंपनीचे शेअर्स २०० डीईएमएच्या (DEMA) खाली आले होते, ज्यामुळे बीएसईच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता खूप वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, बीएसईचा शेअर आता १६५० रुपयांच्या पातळीवर नवीन बेस तयार करत आहे. दरम्यान, गेल्या काही व्यावसायिक दिवसांमध्ये हा स्टॉक २००० रुपयांच्या वर टिकून राहिला आहे, ज्यामुळे ट्रेंड बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
तज्ज्ञांचं मत काय?
स्वास्तिक मार्टचे संतोष मीणा म्हणतात, “आगामी आठवडे खूप महत्त्वाचे असतील. जर बीएसईचा शेअर पुन्हा २०० डीईएमएची पातळी परत मिळवण्यात आणि ती टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला, तर नवीन खरेदीची शक्यता वाढू शकते. परंतु जर कोणत्याही प्रकारे विक्रीचं वातावरण निर्माण झालं, तर हा स्टॉक १६५० रुपयांपर्यंत खाली जाऊ शकतो.”
टार्गेट प्राइस काय आहे?
लक्ष्मीश्रीचे संशोधन प्रमुख (रिसर्च हेड) अंशुल जैन यांच्या मते, खरेदीच्या स्थितीत बीएसईचा शेअर २७३८ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. चांगली गोष्ट अशी आहे की, कंपनीच्या शेअरनं सुरुवातीची टार्गेट प्राईज २०३८ रुपयांची पातळी यापूर्वीच पार केली आहे. जर बीएसईच्या शेअर्समध्ये घसरण झाली, तर सपोर्ट प्राइस १६६१ रुपयांपासून १५७३ रुपयांपर्यंत असू शकते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)