Lokmat Money >शेअर बाजार > दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:50 IST2025-07-12T13:43:48+5:302025-07-12T13:50:41+5:30

Bonus Share: कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

bright outdoor media announced 1 share free on 2 company will give a gift to its customers It will be deposited this month do you have it | दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडनं बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर्स देत आहे. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ही रकॉर्ड डेट २० जुलैपूर्वीच आहे.

कधी मिळणार बोनस शेअर्स?

१० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या २ शेअर्सवर १ शेअर बोनस दिला जाईल. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी १८ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे, असं एक्सचेंजला दिलेल्या माहितीत ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडनं सांगितलं. शुक्रवारी कंपनीनं ही विक्रमी तारीख जाहीर केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीने प्रति शेअर ०.५० रुपये लाभांश दिला होता.

ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी?

ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडचा शेअर शुक्रवारी २.३८ टक्क्यांनी वधारून ५६२ रुपयांवर बंद झाला. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ६ महिन्यांत शेअरच्या किंमतीत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत वर्षभरात १८ टक्क्यांनी वाढलीये. या काळात सेन्सेक्स निर्देशांक ३.२६ टक्क्यांनी वधारलाय.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६१९.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३८१.१० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८१७.६४ कोटी रुपये आहे. ब्राइट आऊटडोअर मीडिया लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतींमध्ये गेल्या २ वर्षात १०२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: bright outdoor media announced 1 share free on 2 company will give a gift to its customers It will be deposited this month do you have it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.