Borana Weaves IPO: Borana Weaves IPO चं शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग झालं आहे. कंपनीचा शेअर बीएसईवर १२.५ टक्क्यांच्या प्रीमियमसह २४३ रुपयांवर लिस्ट झाला. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना या शेअरच्या सकारात्मक लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळालाय. जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागलं. ५ टक्क्यांच्या तेजीनंतर Borana Weaves चा शेअर २५५.१० रुपयांवर पोहोचला, जो बीएसईवरील इश्यू प्राइसच्या तुलनेत १८.१० टक्क्यांनी अधिक आहे. आयपीओसाठी प्राइस बँड २१६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. कंपनीनं एकूण ६९ शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४ हजार १४५ रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
२२ मे पर्यंत खुला होता IPO
Borana Weaves IPO किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २० मे रोजी खुला झाला होता. यात गुंतवणूकदारांना २२ मे पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी देण्यात आली होती. कंपनीच्या आयपीओची साईज १४४.८९ कोटी रुपये होती. कंपनीचा हा इश्यू फ्रेश शेअर्सवर आधारित आहे. आयपीओद्वारे कंपनीनं ६७ लाख फ्रेश शेअर्स जारी केलेत.
अँकर गुंतवणूकदारांकडून ६५.२० कोटी जमवले
हा आयपीओ १९ मे रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ६५.२० कोटी रुपये उभे केलेत. हा आयपीओ ३ दिवसांच्या ओपनिंगदरम्यान १४७.८५ पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल कॅटेगरीमध्ये २००.५० पट, क्यूआयबी कॅटेगरीत ८५.५३ पट आणि एनआयआय कॅटेगरीत २३७.४१ पट आयपीओ सब्सक्राइब झाला होता.
ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ आज ४३ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. ग्रे मार्केटमध्ये मजबूत स्थिती नंतर धमाकेदार लिस्टिंग अपेक्षित होतं.