Bonus Share: फूटवेअर मेकर कंपनी रेडटेप लिमिटेडने (Redtape Ltd) गुरुवारी आपल्या गुंतवणूकदारांना मोठी बातमी दिली आहे. कंपनीने आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर लाभांश (Dividend) आणि बोनस शेअर्सची (Bonus Shares) घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्ससह अंतरिम लाभांश देईल. दरम्यान, या बातमीमुळे गुरुवारी(दि.26) रेडटेप स्टॉकच्या किमतीत जबरदस्त वाढ दिसून आली. आजच्या इंट्राडे ट्रेडमध्ये स्टॉक 5% ने वाढून 915 रुपयांवर पोहोचला.
रेडटेप अंतरिम लाभांश
रेडटेप लिमिटेडने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश आणि बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. कंपनीने प्रति इक्विटी शेअर (100%) ₹2 चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. हा त्याच्या नफ्याचा भाग आहे, जो कंपनीने भागधारकांना रोख पेमेंट म्हणून दिला आहे.
अंतरिम लाभांश रेकॉर्ड तारीख
3 जानेवारी 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत, ते या लाभांशासाठी पात्र असतील. कंपनीने बोनस शेअर्स देण्याचेही जाहीर केले आहे. बोनसचे प्रमाण प्रत्येक 1 शेअरसाठी (3:1) 3 नवीन शेअर्सवर ठेवण्यात आले आहे. यात ₹2 चे दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स असतील. बोनसपूर्वी एकूण शेअर्सची संख्या 13,82,01,900 शेअर्स आणि बोनस नंतरचे शेअर्स 55,28,07,600 शेअर्स असतील.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)