BN Rathi Securities Ltd Share: गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या बीएन राठी सिक्युरिटीज लिमिटेड (BN Rathi Securities Ltd) या कंपनीनं बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीच्या वतीनं शेअर बोनस दिला जात आहे. तर शेअर्सची २ भागांमध्ये विभागणी केली जात आहे. कंपनीनं दोघांसाठी रेकॉर्ड डेट केलीये.
रेकॉर्ड डेट कधी?
एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटलंय की, १ शेअरवर १ शेअर बोनस दिला जाईल. तर १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर २ भागांमध्ये विभागला जाईल. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ५ रुपयांपर्यंत खाली येईल. शेअर बाजारात कंपनी २४ जानेवारीला एक्स-बोनस स्टॉक आणि एक्स-स्प्लिट स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे.
बीएन राठीनं गुंतवणूकदारांना २०२४ मध्ये प्रति शेअर १.५० रुपये लाभांश दिला होता. तर कंपनीनं २०२३ मध्ये गुंतवणूकदारांना १.५० रुपयांचा लाभांश दिला. बीएन राठीच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मागील वर्ष धमाकेदार
गेल्या वर्षभरात या कंपनीनं गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सोमवारी बीएसईवर बीएन राठी सिक्युरिटीजच्या शेअरचा भाव २३०.७० रुपयांवर बंद झाला. या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी नवं वर्ष आतापर्यंत चांगलं गेले नाही. या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास १३ टक्क्यांची घसरण झाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ४४ टक्के तर एका वर्षात १२० टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २९१ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८६.६५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २३९ कोटी रुपये आहे. या बोनस शेअरने २ वर्षात ५००% पेक्षा जास्त आणि ५ वर्षात १४००% पेक्षा जास्त परतावा दिलाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)