BMW Ventures IPO: आज, बुधवार, १ ऑक्टोबर रोजी बाजारात बीएमडब्ल्यू वेंचर्सच्या शेअर्सचं लिस्टिंग झालं. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग अतिशय खराब झालं. औद्योगिक उपकरणांच्या ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशी जोडलेल्या या कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना निराश केलं. NSE वर हा शेअर ₹७८ प्रति शेअरवर लिस्ट झाला, जो त्याच्या ₹९९ च्या इश्यू किमतीपेक्षा २१.२१% नं डिस्काउंटवर होता. BSE वर तो ₹८० प्रति शेअरवर उघडला, म्हणजेच १९.१९% डिस्काउंटसह लिस्ट झाला. या लिस्टिंगनुसार, प्रत्येक गुंतवणूकदाराला एका लॉटवर (१५१ शेअर्स) सुमारे ₹३,१७१ चं नुकसान झालं.
लिस्टिंगसह लोअर सर्किट
विशेष म्हणजे, लिस्टिंगच्या वेळीच या शेअरला ५ टक्क्यांचे लोअर सर्किट लागलं आणि तो ₹७६ वर आला. या शेअरला टी-सेगमेंटमध्ये ठेवलं आहे, याचा अर्थ पहिल्या १० ट्रेडिंग सत्रांपर्यंत यामध्ये इंट्रा-डे ट्रेडिंग (एकाच दिवशी खरेदी-विक्री) करण्याची परवानगी नसेल. तसंच, यावर ५% चा सर्किट फिल्टर लागू आहे. कंपनीनं IPO चा प्राईज बँड ₹९४–₹९९ निश्चित केला होता, ज्यात एक लॉट १५१ शेअर्सचा होता. IPO चा कालावधी २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत होता आणि कंपनीनं या ऑफरमधून सुमारे ₹२३१.६६ कोटी उभे केले होते.
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
कंपनीचा व्यवसाय
पटना स्थित बीएमडब्ल्यू वेंचर्सचे काम मुख्यतः स्टील उत्पादनं, ट्रॅक्टर इंजिन आणि सुटे भाग यांचं ट्रेडिंग/डिस्ट्रीब्यूशन, पीव्हीसी पाईप्स आणि रोल फॉर्मिंगचे उत्पादन, प्री-इंजीनियर्ड बिल्डिंग्ज (PEB) आणि स्टील गर्डर्सचे फॅब्रिकेशन यामध्ये पसरलेलं आहे. कंपनीचे बिहारमध्ये एक मोठे डीलर नेटवर्क आहे. मार्च २०२५ पर्यंत कंपनीकडे १,२९९ डीलर होते, यात २९ जिल्ह्यांचा समावेश होता. IPO मधील बहुतांश रक्कम (₹१७३.७५ कोटी) वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागवण्यासाठी करण्यात येणार आहे, ज्यामुळे दैनंदिन कामकाजाला मदत मिळू शकते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)